26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRatnagiriहिंदू धर्म टिकवण्यासाठी एकसंघतेची वज्रमूठ तयार करा, नरेंद्राचार्याजींचे आवाहन

हिंदू धर्म टिकवण्यासाठी एकसंघतेची वज्रमूठ तयार करा, नरेंद्राचार्याजींचे आवाहन

धर्मसभेला आपल्या या ओघवत्या शैलीत संबोधित करताना नरेंद्राचार्याजींनी हिंदू धर्माभिमान जागविला.

हिंदूंनी एकजूट दाखवत मतदान केले आणि २०१४ मध्ये देशात परिवर्तन झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतरत असतात. पंतप्रधान मोदींच्या रूपात भगवंतांनी हिंदू धर्माची पताका जगभरात फडकावली. हिंदू धर्मच विश्व बंधुत्व आणू शकतो हे मोदींनी आपल्या कार्याने दाखवून दिले. हिंदू धर्माची संस्कृती जगात पोहोचविली असेही त्यांनी नमुद केले.

धर्मसभेचे आयोजन – राजापुरात शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने राजापुरातील सुर्यमंदिराच्या रक्षणासाठी धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या धर्मसभेला संबोधित करताना रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, हिंदू संघटनेचे सागर भैय्या बेग आदी उपस्थित होते.

हिंदूंनी संघटीत होण्याची गरज – धर्मसभेला आपल्या या ओघवत्या शैलीत संबोधित करताना नरेंद्राचार्याजींनी हिंदू धर्माभिमान जागविला. ते म्हणाले की, हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात आपल्या श्रध्दास्थांनासाठी कटोरा घेवून न्याय मागावा लागतो, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. हिंदू बहुसंख्य असूनही आपण संघटीत नाही, जाती पाती, पंथ, पक्ष यामध्ये विभागले गेले आहोत. त्यामुळे एक दिवस हिंदु अडचणीत येतील आणि जर आपण या विरोधात संघटीत झालो नाही तर तो दिवस दूर नाही. त्यामुळे जागे व्हा जागरूक रहा, असे आवाहन त्यांनी केले.

डोळे उघडा – पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर मुस्लीमांनी पाकिस्तानची मागणी केली. फाळणीमुळे दोन देश धर्माच्या आधारावर वाटले गेले तरीही काहींना हिदू द्वेशाचा किडा आहे. हिंदूंनी कधीही कोणत्याही प्रार्थनास्थळावर, मशिदीवर, दर्यावर अतिक्रमण केल्याचे उदाहरण नाही. मात्र काही धर्मांध मुस्लिम मंडळी कायद्याचे संरक्षण घेवून खुलेआम मदरसे उभारत आहेत. मंदिरांवर अतिक्रमण करीत आहेत. त्यामुळे आता डोळे उघडा. घाबरलात तर एक दिवस तुमचं अस्तित्वच कोणी मान्य करणार नाही त्यामुळे संघटीत व्हा, असे आवाहन त्यांनी केले.

हे सूर्यमंदिरच ! – राजापुरातील सूर्यमंदीर हे हिंदूंचेच आहे. त्यावर असलेले शंखाचे चित्र भगवान विष्णूचे प्रतिक आहे. त्यासाठी वेगळा आणखी काय पुरावा हवा असा सवाल उपस्थित करत हिंदू धर्माला झुकविण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जातात, असे सांगत या ठिकाणी आपले उत्सव तत्काळ सुरू करा, आपला अधिकार दाखवा, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदू व्होट बँकेचा धाक निर्माण करा – राजकीय पक्षांनी कायमच हिंदुना जातीपातीच्या चक्रात अडकवून ठेवले आणि आपला स्वार्थ साधला. त्यामुळे यापुढे हिंदू म्हणून एकसंघ होणे काळाची गरज असून हिंदुचे रक्षण करेल त्याचाच पाठिशी राहण्याचा निर्धार करा. स्वातंत्र्यानंतर काही राज्यकर्त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लीमांचे फाजील. लाड करणे सुरू केले. त्यापैकीच एक वक्फ बोर्डचा कायदा असून त्या आधारे कायद्याने अल्पसंख्याकांना अधिकार दिले. त्यामुळे हा कायदा’ बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या हिताच्या आड येत आहे. त्यासाठी हे कायदे बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

हिंदूंचे धर्मांतर हा अजेंडा – काही धर्मांध शक्ती या देशामध्ये राहून हिंदूंना येनकेन प्रकारे खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना धर्मांतरासाठी भाग पाडले जात आहे. त्यामुळे आपली संस्कृती टिकली पाहिजे. त्यासाठी ही मंदिरे वाचली पाहिजेत. त्यासाठी संघटीत व्हा, असे आवाहन नरेंद्राचार्याजींनी करताच सभागृह जय श्रीराम च्या नाऱ्याने दुमदुमले.

आ. जगताप कडाडले – या धर्मसभेत बोलताना अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या धर्माचे रक्षण करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे नमुद करत एकसंघ होण्यांचे आवाहन केले. आपल्या पुर्वजांनी मोगली आक्रमकांना जशास तसे उतर देत आपला हिंदू धर्म व हिंदूत्व टिकवले आहे. आता आपली जबाबदारी आहे, त्यासाठी एकसंघ रहाणे गरजेचे आहे. जाचक कायदे बदलण्याची गरज आहे, असे आ. जगताप आपल्या भाषणात म्हणाले. राजापुरातील हा सुर्यमंदिराचा लढा अधिक तीव्र करूया आंम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शक्ती दाखवून द्या! – छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांशी लढून ३६० किल्ले ताब्यात घेतले होते, त्या छत्रपतींच्या राज्यात आंम्ही रहातो आणि आता आंम्हाला आमच्या हक्कासाठी, मंदिरासाठी लढावे लागते, सभा मोर्चे काढावे लागत आहेत, यासारखे दुदैव नाही. त्यामुळे आता आपणच आपला लढा अधिक तीव्र केला पाहिजे, अनेक मंदिरे मुस्लीमांनी आपल्या ताब्यात घेतली. मात्र हिदू शांत राहिले, मात्र आता शांत बसायचे नाही., कारण आता हा भारत देश बदलला आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी आंम्ही वाट्टेल ते करू असे नमुद करत हिंदूना भ्रष्ट करण्याचे कारस्थान पुर्वीपासूनच सुरू आहे, मात्र आता त्याला बळी पडायचे नाही, आपली शक्ती दाखवून द्यायची, असे आवाहन सागर उर्फ भैय्या बेग यांनी यावेळी केले.

मान्यवरांचा सन्मान – प्रारंभी सकल हिंदू सम नरेंद्राचार्याजी यांसह माजाच्यावतीने मान्यवरांचा दादा राजापकर, महेश मयेकर, मोहन घुमे, संदीप मालपेकर, विवेक गादीकर, राजेंद्र कुशे यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन वकील सुशांत पवार यांनी केले. या धर्मसभेला मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular