26 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeIndiaपंतप्रधान मोदींचे स्वप्न, इस्त्रोच्या सहाय्याने अंतराळात फडकणार तिरंगा

पंतप्रधान मोदींचे स्वप्न, इस्त्रोच्या सहाय्याने अंतराळात फडकणार तिरंगा

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी नवीन उपग्रहाचे वर्णन "गेम चेंजर" असे केले आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून SSLV ‘आझादी SAT’ नावाचा सह-प्रवासी उपग्रह घेऊन जाणार आहे. जो देशभरातील ७५ ग्रामीण सरकारी शाळांमधील ७५० मुलींनी तयार केलेले ७५ पेलोड वाहून नेणार आहे. वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मुलींना त्यांचे करिअर म्हणून अंतराळ संशोधन करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात या प्रकल्पाची खास संकल्पना करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ७ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊ वाजता प्रक्षेपण केले जाणार आहे.

१५ ऑगस्ट २०१८ रोजी देशाच्या ७५ व्या वर्षाच्या स्वातंत्र्यदिना निमित्त तिरंगा अवकाशात फडकवला जाईल अशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली. अंतराळात ध्वज फडकवण्याचे पंतप्रधान मोदींचे वचन पूर्ण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो ७ ऑगस्ट रोजी त्यांचे सर्वात छोटे व्यावसायिक रॉकेट, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल प्रक्षेपित करणार आहे, ज्याद्वारे राष्ट्रध्वज अंतराळात घेऊन जाता येणार आहे. राष्ट्रध्वज असलेल्या ‘गगनयान’ वर मानवयुक्त अंतराळ मोहीम सुरू करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदींचे यांचे होते. मात्र या प्रकल्पाला वेळ अधिक लागणार असल्याने इस्त्रोला SSLV ची मोठी मदत होणार आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी नवीन उपग्रहाचे वर्णन “गेम चेंजर” असे केले आहे. इस्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे की, SSLV मिनी, मायक्रो आणि नॅनो उपग्रह असे १० – ५०० किलो वजनाचे ५०० किमीच्या प्लॅनर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित करण्यास सक्षम आणि तयार आहे. पेलोड इमेजिंगसह सुधारित आणि व्यावहारिक उपग्रह डिझाइन आणि विकसित करणे हे SSLV चे खास उद्दिष्ट आहे.

RELATED ARTICLES

Most Popular