25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeChiplunएकच वादा.. अजित दादा ! चिपळुणात उद्या राष्ट्रवादीचा आवाज घुमणार

एकच वादा.. अजित दादा ! चिपळुणात उद्या राष्ट्रवादीचा आवाज घुमणार

ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र सभा असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पक्षाची जन सन्मान यात्रा राज्यभरात ८ ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भाच्या एकूण ३९ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी जनते सोबत संवाद साधला आहे. याच जनसन्मान यात्रेचा दौरा चिपळूण येथे शनिवार २१ रोजी होणार आहे. दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे सावर्डे येथे आगमन होईल. त्याठिकाणी काही पदाधिकारी त्यांच्या स्वागत करतील. तिथून सर्व ताफा चिपळूण बहादूरशेख नाका येथे येईल. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य बाईक रॅली काढण्यात येणार आहे. नंतर ही रॅली सभेच्या ठिकाणी पोहचेल. येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्याची ते पाहणी करणार आहेत.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोरील पटांगणामध्ये ही जनसन्मान यात्रेची सभा होणार आहे. सायंकाळी चार वाजता या सभेला सुरुवात होईल. किमान दोन तास सभा सुरू राहील. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या सभागृहाला ते भेट देणार असून त्यानंतर स्व. बाळासाहेब माटे सभागृह येथे संध्याकाळी सात वाजता अनेक संघटना, अनेक पक्षाचे पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रात्री मुक्काम करून ते पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम यांनी दिली.

ना. अजित पवार यांची चिपळूण मधील सभा ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र सभा असणार आहे. या सभेला जिल्हाभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची बांधणी आणि आमदार शेखर निकम यांच्या उमेदवारी वरती शिक्कमोर्तब करण्यासाठी यासाठी चिपळूण मधील सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र लगेचच समोर दिनांक २३ रोजी शरद पवार यांची सभा चिपळूण येथे होणार असल्याने काका पुतण्यांच्या या सभांमुळे चिपळूण मधील वातावरण निश्चितच ढवळून निघणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular