चिपळुणात नाताळचा सण आणि सलग आलेल्या सुट्टयांचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईकर, ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे रस्ते वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. मुंबई-गोवा महामार्गासह मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हजारों वाहने एकाच वेळी आल्याने वाहतुकीचे नियमन करणे अशक्य झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसताना दिसतो आहे. सलग सुट्टयांमुळे मुंबईकरांची पावले कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांकडे वळत आहेत. कोकणातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर, हर्णे, मुरुड, दापोली, दाभोळ, गुहागर, हॅदवी, पालशेत, गणपतीपुळे, आरे-वारे, रत्नागिरी, कशेळी, जैतापूरचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. पर्यटनासाठी हजारो मुंबईकरे बाहेर पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरची वाहतूक गुरुवारी सकाळपासून कोलमडली. वाहनांची संख्या वाढल्याने खालापूर टोल नाक्यापासून ते लोणावळा एक्झिट या घाट परिसरात वाहतूक कोंडी झाली. ७ ते ८ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जवळपास दीड ते दोन तास लागत होते. संथ वाहतुकीमुळे घाटात वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही खूप होते.
वाहतूक धिम्या गतीने – दुसरीकडे मुंबई-गोवा महाम ार्गावरील वाहतूकही धिम्या गतीने सुरू होती. पेण ते माणगाव या पट्टय़ात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही बेशिस्त वाहनचालक मार्गिकेची शिस्त पाळत नसल्याने या समस्येत अधिकच भर पडत होती. वडखळ ते अलिबाग या मार्गावरही वाहतूक संथ गतीने सुरू होती. वाहनांची संख्या अचानक वाढल्याने वाहतुकीचे करण्यात अपयश येत नियमन होते.
पर्यटन हंगामाला सुगीचे दिवस – नाताळ सण आणि नववर्षांच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगाम पुन्हा भरात आला आहे. हजारो पर्यटक कोकणात दाखल झाले असून अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, दिवेआगर, हर्णे, कर्दे, मुरुड, दाभोळ, गुहागर, हेदवी, पालशेत, जयगड, गणपती पुळे, आरे वारे, रत्नागिरी, पूर्णगड, कशेळी, व्येत्ये, जैतापूरचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. वाढत्या गर्दीमुळे पर्यटन व्यवसायाला चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत.
समुद्र किनारे हाउसफुल्ल – कोकणातील निळाशार आल्हाददायक समुद्र किनारे पर्यटकांना फुलून गेले आहेत. गणपतीपुळे, आरेवारे, जैतापूर, भाट्ये आदी समुद्र किनारी पर्यटकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. मात्र पर्यटकांनी समुद्रात उतरु नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

