कशेडी घाटात पुन्हा बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. लोकसभा निवडणुकीचा फायदा चाकरमान्यांना होणार आहे. लोकसभा निवडणूक काळामध्ये चाकरमान्यांसाठी भुयारी मार्गातून पुन्हा दुहेरी वाहतूक सुरू होणार असून, १ मे दरम्यान याबाबतची सूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी म ार्गातून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मात्र, मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी वाहतुकीस परवानगी असूनही कशेडी घाटात बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले नसल्याने मुंबईकरांना आज देखील कशेडी टॅपमार्गे खेडकडे रवाना व्हावे लागते.
लवकरच दुहेरी वाहतूक – बांधून पूर्ण झालेल्या त्या बोगद्यामधून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरू राहणार असताना प्रत्यक्षात सध्या तेथून मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मुंबईकडून ‘पोलादपूरच्या बाजूने कशेडी घाटात आलेल्या वाहनांना भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दाखविणारा फलक न लावल्याने कोकणवासीयांची वाहने सध्या कशेडी घाटातील कशेडी टॅप पोलिसचौकीसमोरील जुन्या महामार्गावरून – मार्गस्थ होतात. दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात बोगदा वाहतुकीस खुला करताना ‘वन वे’ असा दिशादर्शक फलक लावून मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना बोगद्याकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणारे बावटेधारी कर्मचारी देखील कशेडी घाटाचा जुना रस्ता आणि बोगद्याचा नवीन तीनपदरी मार्ग या दोहोंच्यामध्ये उभे करण्यात आले होते. अशी व्यवस्था येथे पुन्हा तैनात ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान करण्यासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना भुयारी मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले आहेत.
गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात बोगदा वाहतुकीस खुला करताना ‘वन वे’ असा दिशादर्शक फलक लावून मुंबईकडून येणाऱ्या वाहनांना बोगद्याकडे वळण्यासाठी प्रवृत्त करणारे बावटेधारी कर्मचारीदेखील कशेडी घाटाचा जुना रस्ता आणि बोगद्याचा नवीन तीनपदरी मार्ग या दोहोंच्यामध्ये उभे करण्यात आले होते. अशी व्यवस्था येथे पुन्हा तैनात ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.