27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriफणसवळेमध्ये २ चिमुकल्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

फणसवळेमध्ये २ चिमुकल्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

अचानक ती दोन्ही मुलं पाण्यात पडल्याने त्या जोडप्याने आरडाओरडा करायला सुरूवात केली.

तालुक्यातील फणसवळे कोंडवाडी येथे काळीज पिळवटणारी ही दुर्घटना सोमवारी दु.२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. यातील एक चिमुकला बालवाडीत तर एक मुलगा इयत्ता पहिलीत शिकत होता.

घरातून बाहेर पडले – शाळांना सुट्टी पडल्याने सर्व मुलं सुट्यांचा आनंद लुटत आहेत. फणसवळे, कोंडवाडी येथे स्मित वासुदेव आंबेकर व तनिष्क अक्षय आंबेकर हे चिमुकले घरात खेळत होते. खेळता खेळता दोघेही खाऊ घेण्यासाठी घरातून बाहेर पडले.

खाऊ घेतला – गावातून मिळालेल्या माहितीनुसार स्मित आणि तनिष्क एका दुकानात खाऊ घेण्यासाठी गेले तिथे खाऊ घेतल्यानंतर दोघेही धरणाच्या पात्राकडे खेळत खेळत गेले. त्या ठिकाणी बराच वेळ ते खेळत होते, अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली.

पाण्यात पडले – स्मित आणि तनिष्क हे दोघे खेळत असतानाच गावातील महिला ज्या ठिकाणी कपडे धुतात त्याच ठिकाणी दोघेही पाण्यात पडले. ज्या ठिकाणी ते पाण्यात पडले तिथे कमरेभर पाणी होते. दोघेही तळाला जाऊन पोहोचले असे सांगण्यात येते.

एका जोडप्याने पाहिले – सोमवारी दुपारी २.३० वा. च्या सुमारास एक जोडपे फिरण्यासाठी त्या परिसरात आले होते. दोन मुलं पात्राच्या काठावर खेळत असताना त्यांनी पाहिली. अचानक ती दोन्ही मुलं पाण्यात पडल्याने त्या जोडप्याने आरडाओरडा करायला सुरूवात केली. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ घाबरले.

एकाला बाहेर काढले – दोन मुल पाण्यात पडल्याचे पाहून त्या जोडप्याने पात्राच्या दिशेने धाव घेतली. दोघंही पाण्यात उतरली आणि मुलांना शोधू लागली. काही वेळात एक मुलगा त्यांच्या हाताला लागला त्यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले मात्र त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

एक मुलगा बेपत्ता – एका मुलाला बाहेर काढल्यानंतर दुसऱ्या मुलाचा शोध त्या जोडप्याकडून सुरू झाला मात्र दुसरा मुलगा सापडत नव्हता. याच दरम्यान गावचे सरपंच त्या ठिकाणाहून जात होते. त्या जोडप्याने सरपंचांना त्याबाबतची माहिती दिली.

गाव धावला – फिरायला आलेल्या जोडप्याने सरपंचांना माहिती दिल्यानंतर सरपंचांनी गावाकडे धाव घेतली, गावात जाऊन ग्रामस्थांना त्याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळताच अख्खा गाव धरणाच्या पात्राकडे धावत सुटला.

पाचावर धारण – त्या जोडप्याने ग्रामस्थांना जी माहिती दिली ती माहिती ऐकून साऱ्यांचीच पाचावर धारण बसली. सारेच हबकले होते. पाण्यातून बाहेर काढलेल्या मुलाला तात्काळ एका खाजगी डॉक्टरांकडे हलविण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्या डॉक्टरने सिव्हील हॉस्पिटला हलविण्याचा सल्ला दिला.

पाण्यात उड्या – दरम्यान, गावातील दोन मुल पाण्यात पडल्याची माहिती मिळताच ‘कांही धाडसी तरूणांनी पाण्यात उड्या घेतल्या. ज्या ठिकाणी मुलं पाण्यात पडली होती त्या ठिकाणी चिखल देखील होता, त्यामुळे त्यातील दुसरा मुलगा गाळात अडकला होता. त्याला मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. मात्र त्याला वाचविण्याचे प्रयत्न फेल ठरले.

दोघांचाही मृत्यू – दोन्ही मुलांना जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्या दोघांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून अनेकजण ढसाढसा रडू लागले.

एक पहिलीत तर दुसरा बालवाडीत – मिळालेल्या माहितीनुसार तनिष्क अक्षय आंबेकर हा मुलगा इयत्ता पहिलीत शिकत होता तर, स्मित हा बालवाडीत होता. यावर्षी स्मित पहिलीच्या वर्गात प्रवेश करणार होता. त्याच्या प्रवेशाची तयारी देखील झाली होती.

आई-बापाला शोक अनावर – मुलांना उपचारासाठी रूग्णालयात नेले असे सांगुन त्या मुलांच्या आई- बापाला रूग्णालयात आणले होते, मात्र थोड्या वेळाने दुखःद बातमी त्यांना कळली आणि मुलांच्या आई-बापांनी हंबरडा फोडला. यावेळी साऱ्यांनाच अश्रू अनावर झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular