31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

विनाकारण त्रास द्याल तर गप्प बसणार नाही आ. अनिल परबांचा इशारा

विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल...

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...
HomeRatnagiriजिल्हा रुग्णालयात चांगली सेवा द्या, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

जिल्हा रुग्णालयात चांगली सेवा द्या, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रविवारी अचानक जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली.

जिल्हा रुग्णालयाचे कामकाज अजून सुधारा, तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करा. त्यांना त्रास होता कामा नये, अशी ताकीद जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली, तसेच जिल्हा रुग्णालयाबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांचा विषय गंभीर आहे. ही पदे तत्काळ भरण्याच्या सूचना महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना केल्या आहेत. येत्या १५ दिवसात ही पदे भरली जातील, असे अधिष्ठाता रामानंद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रविवारी अचानक जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली.

या वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. या वेळी विविध विभागांना त्यांनी भेट दिली. तेथील रुग्णांची विचारपूस करून दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत माहिती घेतली. त्यानंतर स्वच्छतेकडे लक्ष दिले. काही ठिकाणी अस्वच्छता दिसली तेव्हा रुग्णालयात स्वच्छता आवश्यक आहे. त्यावर भर देण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. जे कामकाज सुरू आहे त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होता कामा नये, असे स्पष्ट सांगितले.

१५ दिवसांत रिक्त पदे भरणार – जिल्हा शासकीय रुग्णालयातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत तसेच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातदेखील रिक्त पदांची परिस्थिती गंभीर आहे. याचा परिणाम कामकाजावर होणार नाही याची दक्षता घ्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी येत्या १५ दिवसांमध्ये ही रिक्त पदे भरली जातील, असे आश्वासन अधिष्ठाता रामानंद यांनी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular