23.7 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedकशेडीच्या एका बोगद्यातील वाहतूक २० पासून बंद

कशेडीच्या एका बोगद्यातील वाहतूक २० पासून बंद

बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता. गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती; मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी वाहतूक बंद ठेवून काम वेगाने सुरू होते. यंदा २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली.

एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड या दरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही वाहतूककोंडी मोकळी केली होती. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बांधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते.

त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी-गणपती विसर्जन आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा फारसा फटका बसला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular