व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याची तस्करी करून विक्रीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली रत्नागिरीतील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सव्वातीन कोटी रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी हस्तगत केल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. पूण्यातील हिंजवडी बावधन येथील एका हॉटेलसमोर शनिवारी (दि. २२) ही कारवाई करण्यात आली. वनरक्षक सारिका दराडे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. किशोर यशवंत डांगे (वय ४५) व संदीप शिवराम कासार (६२, दोघे रा. रत्नागिरी) यांना अटक केलेल्या संशयीत आरोपींचे नावे असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले.
संशयीत आरोपीपैकी किशोर डांगे हा वाहनचालक असून, संदीप कासारचा शेती तसेच हॉटेल व्यवसाय आहे. संशयित दोन्ही संशयितांना व्हेल माशाची उलटी घेऊन पुण्यात बोलाविण्यात आले होते. पुण्यात आले की संपर्क करतो, त्यानंतर व्यवहार करू, असे यांना सांगितल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल आहे. त्यामुळे उलटीची तस्करी करणारे रॅकेट सक्रिय आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अत्तर, सुगंधित उत्पादनासाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मीळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित ३ उत्पादनासाठी वापरतात.
नैसर्गिकरीत्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. तुकडा कोणत्याही परवानगी शिवाय विक्रीकरिता घेऊन आले होते. याची माहिती मिळताच वनरक्षक विभाग कोलकाता किंवा नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणी हिंजवडी पोलिसांनी हस्तगत केलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तपासणी होणार आहे. कोलकोता किंवा नागपूर येथील प्रयोगशाळेत ही उलटी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक कन्हैय्या थोरात हे करत आहेत.

