महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी बुधवारी (ता. २६) मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रांवर हे मतदान होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. निवडणूक रिंगणात एकूण १२ उमेदवार आहेत; परंतु खरी लढत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यात होणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण २२ हजार ६८१ पदवीधर मतदार आहेत. सर्व मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करावे लागले.
जे मतदार मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, केंद्र, राज्य, सार्वजनिक क्षेत्र, स्थानिक समिती अथवा खासगी आस्थापनांनी नोकरदारांना दिलेले ओळखपत्र, विधानमंडळाने दिलेले ओळखपत्र, शालेय संस्थेने दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाने दिलेले पदवी/पदविका प्रमाणपत्राची खरी प्रत, दिव्यांग ओळखपत्रांचा पर्याय ठेवला आहे. मत नोंदविण्याबाबत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये मतदानाची कार्यपद्धती मतदान करण्यासाठी केवळ मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरावा.