28.6 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeKhedकशेडी घाटात कारना ट्रकांची धडक दोन अपघात

कशेडी घाटात कारना ट्रकांची धडक दोन अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील महामार्ग पोलीस केंद्र कशेडीच्या हद्दीमध्ये दोन कार आणि दोन ट्रक असा चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात (शुक्रवार) रात्री ९.१० वाजता घडला. यातील एका अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी- की, कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती-पुणे ते दापोली- जाणारी हंदाई आय२० कार (एम.) एच४२- बीई-४४४९) घेऊन चालक कैलास मनोहर वनवे (वय ४९, राहणार बारामती पुणे) हे जात असता या कारला मागून टँकरने (डीडी ०१- जे- ९६६०) मागून ठोकर दिली. या धडकेमुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूच्या नाल्यामध्ये गेली.

बारामती पुणे ते दापोली जाणारी क्रेटा कार (एमएच-१२-आरवाय- ८८८८) वरील चालक सुयोग जयवंत कुलकर्णी (वय ३१ वर्षे, राहणार बाराम ती पुणे) टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून गोव्याच्या बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रकने (एमपी-०२- टीई-४८५८) समोरासमोर ठोकर दिली. अपघातामधील दोन्ही कारच्या एअर बॅग ओपन झाल्या. तसेच अपघातामध्ये! हुंदाई आय २० मधील मागे बसलेला प्रवासी दत्तात्रय शरद टेके (वय ४२ वर्षे, राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे) यांना मुकामार लागून अंतर्गत दुखापती झाल्याने तात्काळ नरेंद्र महाराज अॅम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत दत्तात्रय शरद ढेके हे घाबरून गेल्याने हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular