27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeKhedखेडमध्ये फसवणूकप्रकरणी दोघांना अटक

खेडमध्ये फसवणूकप्रकरणी दोघांना अटक

या प्रकरणात संशयिताची संख्या चार झाली आहे.

सुरत, गुजरात राज्यातून बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशन व क्रिप्टो करन्सीद्वारे जास्त परतावा मिळण्याच्या आमिषाने २४ लाख ८५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले. या प्रकरणात संशयिताची संख्या चार झाली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये जिम्मीभाई सुनीलभाई भगत (वय ४० वर्ष, रा. मोटिशेरी गलेमांडी, सुरत गुजरात), सोनू रामलाल टेलर (२४, रा. दिनोडली गाव सुरत गुजरात) या दोघांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती, १९ एप्रिल ते मे २०२४ या कालावधीत व्हॉटसअॅप ग्रुपवरील ट्रेडिंग संदर्भातील येणाऱ्या मेसेजद्वारे फिर्यादी यांना एका कंपनीमध्ये पैशाची गुंतवणूक करुन जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल, असे सांगण्यात आले.

त्याआधारे खेड मधील तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये यापूर्वी नीरज महेंद्र जांगरा (२३, रा. चंदीगढ) व नारायनलाल शंकरलाल जोशी (४७, रा. सुरत, गुजरात) यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांच्या अन्य साथीदार यांचा तांत्रिक व गोपनीय माहितीचा आधारे जिम्मीभाई सुनीलभाई भगत व सोनू रामलाल टेलर यांना १२ सप्टेंबरला अटक करण्यात आली. अटक केलेल्या संशयितामध्ये अद्यापपर्यंत क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तीचे बँक खात्यांचा वापर करून त्यात पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्या दोघांकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेले नीरज महेंद्र जांगरा, नारायनलाल शंकरलाल जोशी हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन भोयर हे करीत आहेत. अशा प्रकाराची आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संबधितांनी तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular