26.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeKokanकत्तलीसाठी ११ जनावरे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पकडल्या

कत्तलीसाठी ११ जनावरे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पकडल्या

संगमेश्वर साखरपा मार्गावर संगमेश्वर बस स्थानक आणि देवरुख मार्गावर दोन गाड्यांमध्ये दाटीवाटीने पाळीव जनावरे भरून जाणाऱ्या दोघांना संगमेश्वर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. या दोन गाड्या आणि पाळीव जनावरे ताब्यात घेतलेली आहेत. कत्तलीसाठी ही जनावरे नेली जात असल्याचा संशय आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या दरम्यान पोलीसांनी ही कारवाई केली. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन कामेरकर, आकाश लांडगे, भाऊ मोहितें यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. शाहूवाडी कोल्हापूर येथील शिवाजी धोंडीराम शिंदे, याने त्याचे ताब्यातील ४०७ टाटा टेम्पोमध्ये गाडीचा इन्श्युरन्स, परवाना नसताना ६ जनावरे दाटीवाटीने भरली होती. वाहतुक करत होते. सुधीर गणपत सावर्डेकर, वय ५३ वर्षे, रा. असुर्डे, जनावरे दाटीवाटीने भरलेल्या स्थितीत घेऊन जात होता.

ही जनावरे गैरकायदा कत्तलीसाठी वाहतुक करीत असल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना मिळाली होती. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊ मोहिते सचिन कामेरकर, आकाश लांडगे, पंदेरे, किशोर जोयशी, सोमा आव्हाड, बरगाळे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटेच्या दरम्यानं संगमेश्वर बस स्थानकाच्या जवळ देवरुख मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये दोन गाडया तसेच ११ जनावरे असा सुमारे ८ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आलेली आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular