25.6 C
Ratnagiri
Wednesday, September 18, 2024

परप्रांतीय हायस्पिड ट्रॉलरच्या घुसघोरीला चाप – मत्स्य विभाग

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी हद्दीमध्ये मोठ्या...

पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक – खासदार नारायण राणे

चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे....

रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे बदलतेय रूपडे…

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे रूपडे बदलत आहे....
HomeRatnagiriरत्नागिरीत सापडले दोन कोरोनाबाधित

रत्नागिरीत सापडले दोन कोरोनाबाधित

नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केले होत्या.

तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या दोघांवर जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू आहे. त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले असून, नेमका कोणता व्हेरिएंट आहे, हे अहवाल आल्यानंतर समजणार आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. राज्यातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र, आता नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केले होत्या.

पालकमंत्री उदय सामंत यांनी खबरदारीसंदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. आरोग्य विभाग सतर्क असताना रत्नागिरी तालुक्यात हे दोन बाधित सापडले आहेत. यामध्ये तोणदे आणि कसोप येथील बाधितांचा समावेश आहे. दोघांचीही प्रकृती बिघडली होती. महिलेला ताप, थंडी, डेंगी झाल्याची लक्षणे होती तर दुसऱ्याचा घसा दुखत होता, ताप येत होता. त्यामुळे नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरू केली आहे. तपासणीमध्ये हे दोघेही बाधित आले आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular