नवीन सरकार स्थापन झाल्यावर प्रथमच सामान्य जनतेचा विचार करून, देशात वाढलेली प्रत्येक गोष्टीतली महागाई लक्षात घेता, मागील काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर केंद्र सरकारने अबकारी कर कमी केले होते. त्यावेळी देशातील अनेक राज्यांनी दरामध्ये कपात केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यावेळी दर जैसे थेच ठेवले होते. आता आपण पेट्रोल पाच आणि डिझेल तीन रुपयांची दर कपात करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी इंधनदर कपात केल्याचं म्हटलं. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. फामपेडाचे (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) अध्यक्ष उदय लोध यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे
फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध हे म्हणाले की, या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रात डिझेलचे जे दर कमी होणार आहेत, त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या बॉर्डरना त्याचा फायदा होईल. तिकडून वाहतूक करणारी वाहने महाराष्ट्रात डिझेल भरतील. कारण जेव्हा आपल्याकडे या राज्यांपेक्षा दर जास्त होता, तेव्हा बॉर्डरवरचा सेल या इतर राज्यात जात होता.
पण आता महाराष्ट्रातील दर कमी झाल्याने महाराष्ट्रातली विक्री वाढेल, असे उदय लोध यावेळी म्हणाले. दरम्यान कर्नाटक आणि गोवा या राज्यामध्ये आपल्याकडील दरापेक्षा अजूनही इंधन स्वस्त असल्याचे लोध यावेळी म्हणाले.