25.8 C
Ratnagiri
Wednesday, November 26, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपालकमंत्री उदय सामंत यांनी “हा प्रश्न” काढला निकाली, रहिवाश्यांना दिलासा

पालकमंत्री उदय सामंत यांनी “हा प्रश्न” काढला निकाली, रहिवाश्यांना दिलासा

पुढील ३० वर्षांसाठी मुदतवाढ देताना येथील रहिवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथील रत्नागिरी सहकारी गृहकुटीर संस्थेत राहणाऱ्‍या ११६ रहिवाशांचा भाडेकरार नोव्हेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आला होता. भाडेकरार संपुष्टात आल्याने ११६ कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब येथील स्थानिक लोकप्रतिनिधी शिल्पा सुर्वे, सौरभ मलुष्टे, दीपक पवार, पूजा पवार, प्रशांत सुर्वे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कानावर घातली. मंत्री सामंत यांनी तत्काळ या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबईत मंत्रालय येथे बैठक आयोजित केली.

क्रांतीनगर भागातील रत्नागिरी सहकारी गृहकुटीर संस्थेतील ११६ घरांच्या मुदतवाढीचा प्रश्न उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी निकाली काढला आहे. पुढील ३० वर्षांसाठी मुदतवाढ देताना येथील रहिवाशांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

बुधवारी उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ११६ घरांचा भाडेपट्टी करार नूतनीकरण करण्याबाबत तसेच अस्तित्वात असलेल्या घरांवर कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी सातबाराच्या इतर हक्कांमध्ये नावाचा समावेश करण्यासंदर्भात चर्चा झाली. चर्चेअंती सद्यःस्थितीत भाडेपट्टा करार ३० वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योजक किरण उफ भैय्या सामंत, जिल्हा महिला संघटक शिल्पा सुर्वे, शहर संघटक सौरभ मलुष्टे, पूजा पवार, प्रशांत सुर्वे, दीपक पवार, संस्थेचे अध्यक्ष मौलवी नदाफ, सुनील शिवलकर, रामचंद्र कदम, नागेश चिकोडीकर, अशोक शेंगणी आणि श्रीपाद सावंत उपस्थित होते. मिळालेल्या मुदतवाढीमुळे स्थानिक नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular