21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढली.

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन येथील उद्योग व्यवसायाला ‘बरकत’ यावी यासाठी जे अथक परिश्रम घेतले त्याबद्दल रत्नागिरीतील व्यावसायिकांनी त्यांची रत्नागिरी बाजारपेठेतून पुष्पवृष्टी करीत, ढोल ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढली…

लोकप्रतिनिधीला मिळाला! – रत्नागिरीतील व्यावसायिकांनी सोम. दि. ७ ऑक्टो. रोजी ना. उदय सामंत यांची वाजत गाजत उत्स्फूर्त मिरवणूक काढली.

इतिहास घडला ! – रत्नागिरीतील श्रीराम आळी हे रत्नागिरी शहराचे गावठाण होय. रत्नागिरी शहराची स्थापना ब्रिटीश काळात सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी ज्या राम आळीतून झाली त्याच राम आळीतून ना, उदय सामंत यांची व्यावसायिकांनी पुष्पवृष्टी करत जल्लोषात मिरवणूक काढली हे वैशिष्ट्य होय!

राम नाक्यावर स्वागत – रत्नागिरीतील श्रीराम नाक्यावर ना. उदय सामंत यांचे आगमन होताच तेथे जमा झालेले व्यावसायिक पुढे सरसावले. त्यांना काही सांगायचे स असेल म्हणून उदय सामंत यांनी गाडी उन थांबवली व ते गाडीतून बाहेर आले. न रत्नागिरीतील व्यापारी मंडळींनी तेथे अगोदरच एक फुलांनी शृंगारलेली जीप आणून ठेवली होती.

शृंगारलेली जीप – व्यावसायिक मंडळींनी ना. उदय सामंत यांना त्या गाडीत बसण्याची विनंती केली व बाजारपेठेतून त्यांना मिरवत नेण्याचा आपला मनसुबा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विनंतीला मान देऊन ना. उदय सामंत शृंगारलेल्या उघड्या जीपमध्ये आले व मग जल्लोषात ही अभूतपूर्व मि रवणूक मिरवत मिरवत बाजारपेठेतून निघाली.

उदय सामंतांवर पुष्पवृष्टी – बाजारपेठेत दुतर्फा असलेले दुकानदार, व्यावसायिक तसेच फुटपाथवरील विक्रेते या सर्वांनी एकजुटीने अगोदरच तयारी करुन ठेवली होती. ना. उदय सामंत नजीक येताच व्यावसायिक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत, त्यांचे अभिनंदन करीत व जयघोष करीत. अशी ही मिरवणूक राम नाक्यावरुन राधाकृष्ण नाक्यापर्यंत आली.

गोखले नाक्यावर सत्कार – राधाकृष्ण नाक्यावर वाद्यांचा जंगी ‘गजर’ करण्यात आला. नंतर मिरवणूक आस्ते कदम गोखले नाका येथे आली. तेथे ना. उदय सामंत जीपमधून पायउतार झाले. त्यांचा जमलेल्या सगळ्या व्यावसायिकांनी सत्कार केला, अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. नंतर ना. उदय सामंत यांनी मोजक्या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व ते पुन्हा आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रम ासाठी रवाना झाले.

विविध संघटना – व्यापारी व व्यावसायिकांच्या विविध संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, चेंबर ऑफ कॉमर्स, सुवर्णकार संघटना, रत्नागिरी ता. व्यापारी महासंघ, हॉटेल असोसिएशन, नाभिक समाज हितवर्धक मंडळ, अंजना कालबी चौधरी समाज, फळभाजी व्यापारी संघटना, कापड व्यापारी संघ, मोबाईल व्यापारी संघटना, सायक्लीस्ट क्लब, पथविक्रेते समिती आदी संघटनांच्या वतीने ना. उदय सामंत यांचा हा हृद्य सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular