24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriशिरगाव केंद्रातून ३५ टन बियाण्यांची विक्री भातबियाण्यांच्या 'लेट व्हरायटी'ना प्राधान्य

शिरगाव केंद्रातून ३५ टन बियाण्यांची विक्री भातबियाण्यांच्या ‘लेट व्हरायटी’ना प्राधान्य

लांबणाऱ्या पावसाचा परिणाम कोकणात पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या भात लागवडीच्या वेळापत्रकावर झाला आहे. वटपौर्णिमेपूर्वी पेरण्यांची कामे आटोपून शेतकरी लागवडीसाठीची कामे सुरू करत होता. सध्या वातावरणातील बदलांमुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यांचा अंदाज घेऊन शेतकरीही उशिराने (लेट व्हरायटी) म्हणजेच १३५ ते १४० दिवसांनी तयार होणाऱ्या भात बियाण्यांच्या लागवडीला प्राधान्य देत आहे. दहा वर्षांच्या तुलनेत अशी लागवड करणाऱ्या २० टक्के शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे शिरगाव कोकण कृषी संशोधन केंद्रातून उशिराने होणाऱ्या ३५ टन बियाण्यांची विक्री झाली, असे केंद्राचे प्रभारी अधिकारी विजय दळवी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शिरगाव येथील संशोधन केंद्रातून उशिराने होणारी भातबियाणे (गरवी) व मध्यम (निमगरवी) बियाणे यांची अधिक विक्री होत आहे.

संशोधन केंद्रात यंदा लवकर होणाऱ्या हळवी (लवकर होणारी) बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गरवी बियाण्यांमध्ये विद्यापिठाने प्रसारित केलेल्या रत्नागिरी-८, कर्जत -२ आदींचा समावेश आहे.  संशोधन केंद्रात सध्या कमीत कमी दिवसात म्हणजेच १२०, ११० दिवसात होणारी भात बियाण्याची जात उपलब्ध आहे. निमगरवीमध्ये रत्नागिरी-२४ आणि रत्नागिरी ५ आदींचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ६७ हजार हेक्टरवर भात लागवड होते. पूर्वी ३० टक्के गरवी प्रकारची बियाणे लागवडीखाली येत होती. आता ते प्रमाण ५० टक्केपर्यंत पोचले आहे. शेतकरी दर्जेदार आणि बारीक तांदळांसाठी अधिक मागणी करत आहे. मागील पाच वर्षांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पेरण्यांचे वेळापत्रक बदलले आहे. दरवर्षी सर्वसाधारण दहा ते बारा दिवसांनी पेरण्या पुढे जातात. यंदा त्याचा प्रत्यय पुन्हा जाणवत आहे.

पहिला आठवडा संपून गेला तरीही पावसाची चिन्हे नसल्यामुळे शेतकरी पेरण्यांच्या प्रतिक्षेतच आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळांमुळे पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. उशिरापर्यंत मोसमी पाऊस पडत राहतो. परिणामी, भातकापणीवेळी मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते. यासाठी अनेक शेतकऱ्यांनी हळवी बियाणे पेरण्याऐवजी गरवी, निमगरवी बियाणे लागवडीला प्राधान्य देत आहेत. हा बदल गेल्या ३ वर्षात सर्वाधिक दिसत असल्याचे तज्ज्ञांसह शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular