22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeDapoliउन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाची दुरावस्था, पर्यटनावर परिणाम

उन्हवरे येथील गरम पाण्याच्या कुंडाची दुरावस्था, पर्यटनावर परिणाम

उन्हवरेतील गरम पाण्याच्या कुंडासारखी काही गैरसोयीची पर्यटनस्थळे पाहिल्यावर पर्यटकांची निराशा होते.

कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण. अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक वास्तू येथे आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना समुद्रकिनाऱ्याची जोड असल्याने, पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दापोली तालुका हे पर्यटनाचे महत्वाचे केंद्र आहे. येथील स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनारे, सुवर्णदुर्ग किल्ला, कड्यावरचा गणपती, परशुरामाची मूर्ती, हर्णै बंदर, पन्हाळेदुर्ग लेणी, केशवराव मंदिर, कोकण कृषी विद्यापीठ अशी ठिकाणे पाहण्यासाठी लांबून पर्यटक दापोलीत येतात. मिनी महाबळेश्वर अशी त्याची ख्याती आहे. मात्र येथे आल्यावर उन्हवरेतील गरम पाण्याच्या कुंडासारखी काही गैरसोयीची पर्यटनस्थळे पाहिल्यावर पर्यटकांची निराशा होते. त्यामुळे पर्यटकांचा कायम ओढा असलेल्या पर्यटनस्थळांचा विकास करणे महत्वाचे आहे.

दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ गरम पाण्याच्या कुंडाची झालेली दुरवस्था पर्यटकांची गैरसोय करणारी ठरत आहे.  गरम पाण्याच्या कुंडामुळे या गावाला उन्हवरे हे नाव पडले आहे. उन्हवरे परिसराला निसर्गाची भरभरून देणगी आहे. अरबी समुद्रालगत खाडी, चारही बाजूला डोंगर, गर्द वनराई यामुळे पर्यटकांची पावले उन्हवरे गावाकडे वळतात. मात्र येथील प्रसिद्ध गरम पाण्याच्या कुंडाची आणि आजूबाजूच्या परिसराची झालेली दुरवस्था पाहून लांबुन आलेल्या पर्यटकांची निराशा होत आहे.

येथील गरम पाण्याच्या कुंड परिसरात अस्वच्छता पसरली आहे. हे काम उन्हवरे, फरारे, वावघर ग्रुप ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्टया परवडणारे नाही आहे. या कुंडाला लागूनच बांधण्यात आलेल्या महिलांच्या स्नानगृहाच्या दरवाजाची देखील मोडतोड झाली आहे. येथेच असलेले स्वच्छतागृहही नादुरुस्त आहे. तसेच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशा अनेक गैरसोयीमुळे येथील पर्यटनावर विपरित परिणाम होत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्याबाहेरून दापोलीत येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतू दापोली तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

RELATED ARTICLES

Most Popular