24.2 C
Ratnagiri
Monday, January 5, 2026

कोकण रेल्वे मार्गावर गाडयांची रखडपट्टी, प्रवाशांचे मोठे हाल

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून त्यामुळे नव...

कुंभार्ली घाटात अवघड वळणावर मालवाहू ट्रक उलटल्याने अपघात

चिपळूण- पाटण मार्गावर कुंभार्ली घाटात रस्त्याच्या दुर्दशेमुळे...
HomeRatnagiriथकित कर्जप्रकरणी बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश, गुन्हा दाखल

थकित कर्जप्रकरणी बँकेने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश, गुन्हा दाखल

एक अनोळखी इसम बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचेही आढळून आले आहे.

देवरूख येथील बँक ऑफ इंडिया शाखेकडून कर्जाच्या थकीत प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेत बेकायदेशीर प्रवेश करून सील तोडल्याप्रकरणी एका विरूद्ध देवरूख पोलिसस्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश शिरीष पवार असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी पत्रकारांना सांगितले ‘की, संशयित आरोपी प्रथमेश शिरीष पवार याने बँक ऑफ इंडिया, शाखा देवरुख येथून रु. १८,२५,०००/- इतके कर्ज घेतले होते. या कर्जासाठी देवरुख नगरपंचायत हद्दीतील घर क्रमांक ४४९, एकूण क्षेत्रफळ ३०० चौ.मी. (बांधकाम क्षेत्र ८४, ३० चौ.मी.) ही म ालमत्ता बँकेकडे तारण ठेवण्यात आली होती. दिनांक २४ एप्रिल २०२४ ते १९ मे २०२४ या कालावधीत हा कर्ज व्यवहार झाला.

मात्र, आरोपीकडून कर्जाची परतफेड न झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी संबंधित खाते थकीत (एनपीए) घोषित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी बँकेने सदर मालमत्तेचा ताबा घेण्याची कार्यवाही केली. या वेळी तहसीलदार, देवरुख यांनी अधिकृत पंचनाम्याद्वारे बँकेला मालमत्तेचा ताबा दिला होता. ताबा दिल्यानंतर पंचनाम्याच्या वेळी मालमत्तेच्या दरवाज्यावर लावण्यात आलेले कुलूप व सील आरोपीने तोडून नुकसान केले, असा ओरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. तसेच बँकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतीत गैरहेतूने व अनधिकृतरीत्या प्रवेश करून अतिक्रमण करत बेकायदेशीर ताबा घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या घरामध्ये एक अनोळखी इसम बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचेही आढळून आले आहे. ही कृती लोकसेवकांनी कायदेशीररीत्या जारी केलेल्या आदेशाचा भंग करणारी असल्याचे पोलिसांकडून नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी पत्रकारांना ही माहिती देताना सांगितले की, या प्रकरणी बँक ऑफ इंडिया, रत्नागिरीचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार रामबदनसिंह यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्या फिर्यादीनुसार संशयित आरोपीविरूद्ध देवरुख पोलीस ठाण्यात दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी भा.दं.वि. कलम ४२७, १८८, ४४७, ४४८ तसेच सुरक्षा हितसंबंध व आर्थिक मालमत्ता अंमलबजावणी कायदा, २००२ (सरफेसी कायदा) पुनर्रचना कलम २९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular