तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली आणि पहाटेपर्यंत सलग पाऊस सुरू झाली होती. या पावसामुळे ग्राम ोण भागात अक्षरशः तारांबळ उडाली. तसेच आंबा आणि काजू पिकांना देखील या पावसाचा फटका बसण्याची श्यक्यता असून बागायतदार भयभीत झाले आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचून रस्ते धोकादायक बनले आहेत. पावसाळी हंगामात पाऊस तसा साधारण राहिला होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने एक्झिट घेतली होती. आता दोन महिने पूर्ण होत असतांना पुन्हा अवकाळी पावसाने क सुरुवात केली आहे. चिपळूणमध्ये सोमवारी सायंकाळीच पावसाचे वातावरण दिसून येत होते. मध्यरात्री नंतर मात्र पावसाने जोरदार सुरुवात केली.
मेघगर्जनेसह आलेल्या या पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. पहाटे ५ वाजेपर्यंत सलग पाऊस पडत होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करण्यात आला होता. मंगळवारी सकाळपासूनच मळभ होते. त्यामुळे पुन्हा अवकाळीची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुपारनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली. काही वेळेतच पाऊस थांबला. परंतु पावसाळी वातावरण संध्याकाळपर्यंत कायम होते. या पावसामुळे ग्रामीण भागात मात्र चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात जानेवारी ते फेब्रुवारी या काळात घरे, गोठे दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. त्याप्रमाणे आताही काही घरांच्या दुरुस्तीचे व गोठे शाकारणीची कामे सुरू आहेत.
अचानक आलेल्या या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडचण निर्माण होऊन काही घरात थेट पावसाचे पाणी पडले. त्यामुळे मध्यरात्री तारांबळ उडाली होती. या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी माती रस्त्यावर येऊन चिखल निर्माण झाल्याचे घटना देखील घडल्या. चिपळूण फेरशी तिठा येथे महामार्गाच्या कामाची माती रस्त्यावर आल्याने अडचण निर्माण झाली होती. दुचाकी घसरून पडण्याचे प्रकारही घडले. नंतर मात्र महामार्ग ठेकेदाराने उपाययोजना करून रस्ता सुरळीत करण्यात आला. अनेक ठिकाणी असे प्रकार घडले त्यामुळे रस्ते धोकादायक बनले होते. या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.