20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKokan४८ तास धोक्याचे ! कोकणासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

४८ तास धोक्याचे ! कोकणासह राज्यावर अवकाळी पावसाचे सावट

३ दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

कोकण उपनगरांमध्ये मागील २४ तासांमध्ये किनारपट्टीसह मुंबई शहर आणि अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळालं. तर, मराठवाडा, विदर्भात मात्र पारा चांगलाच वाढल्याचं लक्षात आलं. अकोल्यामागोमाग म ालेगावातही पारा चाळीशीपार पोहोचला असून, ४३ ते ४४ अंशांदरम्यानच्या तापमानानं नागरिकांची चांगलीच होरपळ केली. पुढील ४८ तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार असून, पुन्हा अवकाळीचे ढग राज्यावर दाटून येताना दिसतील. ज्यामुळं पूर्व विदर्भाला उन्हाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढचे ३ दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि सोबतच मराठवाड्याच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलग ३ दिवस उष्णतेचा मारा सहन केल्यानंतर अखेर गुरुवारी पुण्यातील तापमानात घट झाली. पण, ही घट क्षणित असून, पुढचे तीन दिवस मात्र इथं तापमानात वाढ होताना दिसणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होत असली तरी सरासरीपेक्षा मात्र हा आकडा अधिक राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular