26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरीत अवतरली अवघी पंढरी... विठुरायाच्या मूर्तीचे अनावरण

रत्नागिरीत अवतरली अवघी पंढरी… विठुरायाच्या मूर्तीचे अनावरण

गोल रिंगण झाल्यानंतर सर्व वारकरी दिंड्या शिर्के उद्यान येथे दाखल झाल्या. 

शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती, अविस्मरणीय असा रिंगण सोहळा, ढोल, मृदुंग, टाळांचा गजर, अश्व अभिवादन, सर्व टाळकरी, वारकरी, भाविक दिंड्यांचे विविध खेळ, वादन आणि भजन अशा या अभूतपूर्व नेत्रदीपक सोहळ्याने रत्नागिरीकर अक्षरशः भारावून गेले. श्री विठू माऊलीच्या अनावरण सोहळ्याला जणू पंढरीच अवतरल्याचा सुखद सोहळ्याचा अनुभव रत्नागिरीकरांनी घेतला. निमित्त होते माळनाका येथील शिर्के उद्यानात उभारलेली राज्यातील सर्वांत मोठ्या विठू माऊलीच्या पूर्णाकृती मूर्तीच्या अनावरणाचे. काल या सोहळ्याला राज्यभरातून शेकडो वारकऱ्यांची उपस्थिती होती.

सोहळ्यापूर्वी माळनाका ते मारूतीमंदिर सर्कलवरून पुन्हा माळनाका येथे वारकरी दिंडी झाल्यानंतर मराठा मैदान येथे रिंगण सोहळा रंगला.  ढोल, मृदंग, टाळ वादन तसेच अश्व अभिवादनात या सोहळ्याचा उत्साहदेखील देखणा होता. सर्व टाळकरी, वारकरी भाविक दिंड्यांचे विविध खेळ, वादन आणि भजन या अभूतपूर्व नेत्रदीपक अविस्मरणीय सोहळ्याचा रत्नागिरीकरानी आनंद लुटला. २५० वर्षांपूर्वीपासूनची पंढरपूर वारीमधील अश्व रिंगण परंपरा असलेले शितोळे सरकार यांचे अश्व, हिरा आणि मोती यांचे रत्नागिरीतील वारीसाठी आगमन या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.

गोल रिंगण झाल्यानंतर सर्व वारकरी दिंड्या शिर्के उद्यान येथे दाखल झाल्या. यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आणि माधव महाराज शिवणीकर यांनी रिमोटची कळ दाबत श्री विठ्ठलाच्या पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी शहरातील महिला भजनी मंडळ हरिपाठ आळवला. यानंतर संत साहित्य संमलेनाचे औचित्य साधत समस्त रत्नागिरीकर आणि हजारो वारकरी व विठूरायाच्या साक्षीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना तुळशीहार, सन्मानचिन्ह आणि वारकरी संप्रदायासाठी केलेल्या कार्याबद्दल श्री विठ्ठलाची ५ किलोची चांदीची मूर्ती देऊन सन्मानित केले. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांचाही सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular