26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeKhedवैभव खेडेकरांचा प्रवेश पुन्हा लांबणीवर…

वैभव खेडेकरांचा प्रवेश पुन्हा लांबणीवर…

मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी वैभव खेडेकर यांनी केली होती.

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश पुन्हा एकदा लांबला आहे. मंगळवारी नवरात्रौत्सवाचे औचित्य साधत हा प्रवेश मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता, कार्यकर्त्यांसह वैभव खेडेकर तेथे पोहोचले होते. मात्र अचानक प्रवेश रद्द झाल्याचे वृत्त हाती आले आहे. याआधी ४ सप्टेंबरचा मुहूर्त ठरला होता. मात्र त्यावेळी मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे तो लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी हा प्रवेश निश्चित करण्यात आला होता. मात्र तो देखील लांबणीवर पडला आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी वैभव खेडेकर यांनी केली होती. मात्र अचानक प्रवेश रद्द झाला. लवकरच तो होईल, असे सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले वैभव खेडेकर? – दरम्यान हा प्रवेश दुसऱ्यांदा लांबणीवर पडल्यानंतर दस्तुरखुद्द माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘मला माहिती होते की, पक्षप्रवेश आज होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते, म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की, वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो. मी भाजपाचे काम सुरू केले आहे’, असे त्यांनी सांगितले. केवळ औपचारिकता बाकी पक्षप्रवेश ही फक्त औपचारिकता राहिली आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली.

यानंतर लगेचच आम्ही भाजपाचे काम सुरू केले, असे वैभव खेडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपामध्ये पक्षप्रवेश होऊ नये, यासाठी कुणी विरोध करत आहे का, या प्रश्नावर बोलताना वैभव खेडेकर यांनी सांगितले की, मी काही मोठा कार्यकर्ता नाही. मी २० वर्षे मनसेचे काम केले. यापेक्षा आता दुप्पट ताकदीनें भाजपाचे काम करणार आहे. कोकणात कमळ फुलवण्याचे काम आम्ही करू. अनेक जिल्हाध्यक्ष तसेच शेकडो पदाधिकाऱ्यांची यादी सोबत घेऊन आलो आहे, असे सांगून माझा भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे, असा विश्वास वैभव खेडेकर यांनी केला. दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेशाला आता नेमका कधी मुहूर्त मिळतो? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular