रत्नागिरी शहरात पोलिसांनी जप्त केला १ किलो गांजा

198
Ratnagiri police seized 1 kg ganja

शहरात अंमलीपदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली असून एका चायनिज सेंटरमध्ये धाड टाकून पोलिसांनी एक किलो गांजा हस्तगत केला आहे. भररस्त्यात गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या या तक्रारीवरून शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून हेमंत पाटील नामक संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. शहरात राजरोसपणे चरस गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असताना शहर पोलिसांनी अंमलीपदार्थ विक्रीविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तस्करांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांनी सुरु केलेले असतानाच झाडगाव-परटवणे परिसरात एका चायनिज सेंटरबाहेर गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. या तक्रारीनुसार पोलिसांनी झाडगाव- परटवणे नदीकिनारी असलेल्या चायनिज सेंटरवर बारीक लक्ष ठेवले होते. गांजाची विक्री होत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणाचा निर्णय घेतला.

गुरुवारी दुपारी पोलिसांचा मोठा फौजफाटा झाडगाव-परटवणे नदीकिनारी दाखल झाला. हा.. फौजफाटा येण्यापूर्वी साध्या वेशातील पोलिसांची सापळा रचला होता.. फौजफाटा रवाना झाल्याचे कळताच पोलिसांनी चायनीज सेंटरमध्ये धाड टाकली. या कारवाईत पोलिसांना मोठ्याप्रमाणात गांजा मिळून आला. पोलिसांचा फौजफाटा दाखल होताच डॉग स्कॉडच्या मदतीने परिसरात मोठी शोधमोहीम सुरु झाली. त्यामध्ये सुमारे लाखो रुपये किमतीचा १ किलो गांजा पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी हेमंत पाटील नामक संशयिताविरोधात एनडीपीएस कायदा कलम ८, २७ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. हि कारवाई प्र. पोलीस अधिकारी समाधान पाटील, एपीआय मनोज भोसले, पीएसआय पंकज खोपडे, पीएसआय मोबीन शेख, मीरा महामुने, कमल दुधाले, पोकॉ. अमित पालवे यांनी केली.