27.2 C
Ratnagiri
Thursday, June 13, 2024

पाकिस्तान सामना न खेळताच T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार….

आधीच संकटात सापडलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघावर संकट...

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस सोडणार

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी वारकरी दरवर्षी 'विठू नामाचा...

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी...
HomeRatnagiriवाहन चोरीतील दोघे मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या ताब्यात

वाहन चोरीतील दोघे मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या ताब्यात

शहरामध्ये वायफाय केबल ऑपरेटरचे काम करणाऱ्या दोन तरुणांनी त्यांच्या चैनीसाठी मोटार, दुचाकी वाहन चोरल्या असल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसापासून, गाड्या चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहेत. पोलीस यंत्रणा या चोरांचा मागमूस लावायचा कसोसीने प्रयत्न करत आहेत. अखेर दोघा संशयितांना रविवारी अटक केली असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळाली आहे.

शहरामध्ये वायफाय केबल ऑपरेटरचे काम करणाऱ्या दोन तरुणांनी त्यांच्या चैनीसाठी मोटार, दुचाकी वाहन चोरल्या असल्याचे समोर आले आहे. वाहन चोरीतील दोघे मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्याचेकडून ७ लाख ८० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर पुन्हा आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. प्रथम जयेश खानविलकर वय १९, रा. लक्ष्मीकृपा शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी आणि आयुष संतोष भागवत वय १९, रा. टीआरपी, सह्याद्रीनगर नाचणे, रत्नागिरी अशी संशयिताची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत धाकटू शिंदे वय ६८, रा. आयटीआय सोसायटी, साईनगर-कुवारबाव, रत्नागिरी यांच्या घरी संशयित प्रथम खानविलकर वायफायचे काम करायला गेला होता. त्याने शिंदे यांच्या घरातील वाहनाची चावी चोरून नेली होती. त्यानंतर ते घरात नसताना त्यांची मोटार देखील चोरून तिथून पलायन केले. या प्रकरणी शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे अमलदार प्रवीण बर्गे, पोलिस नाईक संकेत महाडिक, हवालदार अमोल भोसले, मनोज लिंगायत, भालेकर यांनी संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने गाडी चोरल्याचे कबूल केले व गाडी भाड्याने राहात असल्याठिकाणी पार्क केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयित खानविलकर यांच्या घराजवळून वाहन ताब्यात घेतले. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनचे ओळखपत्र व महाराष्ट्र शासनाची पट्टीही दिसून आली. यामुळे पुन्हा चौकशी केली असता प्रथम खानिवलकर याने दुचाकी चोरी केल्यानंतर संशयित आयुष भागवत यांच्या सहकार्याने नंबर प्लेट बदलून त्याची विल्हेवाट लावत होता अशी कबुली दिली.

RELATED ARTICLES

Most Popular