26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeMaharashtraसर्व गाड्यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये होणार वाढ!

सर्व गाड्यांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये होणार वाढ!

आता पुढील महिन्यापासून महागाईची झळ सोसणाऱ्या जनतेला आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सर्वच क्षेत्रामध्ये महागाई वाढतच चालली असल्याने, सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळत चालली आहे. इंधन दरवाढीने सर्व त्रस्त झाले असून, त्यामुळे अनेकांनी सीएनजी वाहने खरेदी केली तर त्याची सुद्धा दरवाढ झालीच आणि पुरवठ्याची अनियमितता यामुळे वाहन चालक अजून महागाईच्या गर्त्यात पडलेत अशी अवस्था झाली आहे. त्यामध्ये अजून भर म्हणून आता गाड्यांच्या इन्शुरन्स प्रीमियमच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे.

आता पुढील महिन्यापासून महागाईची झळ सोसणाऱ्या जनतेला आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कार, बाईकसह सर्व गाड्यांचे थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाने वाहनांवरील इन्शुरन्स विमा १ जूनपासून वाढ लागू होणार आहे. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचां इन्शुरन्स महाग होणार आहे.

मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटलंय की, १ हजार इंजिन सीसी क्षमता असणाऱ्या खासगी वाहनांचा प्रीमियम २०१९-२० मध्ये २०७२ रुपयांवरून आता २०९४ रुपये होणार आहे. याचप्रकारे १ हजार ते दीड हजार सीसी इंजिन असलेल्या खासगी वाहनांना प्रीमियम ३ हजार २२१ रुपये ऐवजी आता ३ हजार ४१६ रुपये भरावे लागतील. तर १५०० हून अधिक सीसी खासगी वाहनांना थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये काहीशी घट केली आहे.

७ हजार ८९७ वरून आता ७ हजार ८९० रुपये भरावे लागतील. याचप्रकारे १५० ते ३५० सीसीपर्यंत दुचाकी वाहनांना १ हजार ३६६ रुपये असतील. तर ३५० हून अधिक सीसी दुचाकी वाहनांसाठी २ हजार ८०४ रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अजून महागाईमध्ये भर पडल्याने जनता हतबल झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular