26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriलोकसभा निवडणुकीत विजय महत्त्वाचा - पालकमंत्री उदय सामंत

लोकसभा निवडणुकीत विजय महत्त्वाचा – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ यापूर्वी शिवसेनेचा होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी संबंधित ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळते याच्यापेक्षा या मतदार संघातून आपला खासदार निवडून जाणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यानी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सामंत म्हणाले की, नव्वदीच्या दशकामध्ये परिवर्तनाच्या लाटेची मुहूर्तमेढ बाळासाहेब ठाकरे यांनी राजापूर येथे सभेत रोवली होती. त्यानंतर, कोकणात राजकीय परिवर्तन झाले. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन करण्याची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा राजापुरामध्ये रोवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत विजयी करूया. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ यापूर्वी शिवसेनेचा होता. त्यामुळे या वेळी येथील खासदारही निश्चित आपलाच होईल. लोकसभेसाठी या ठिकाणी दीपक केसरकर, रवींद्र फाटक आणि किरण सामंत यांची इच्छुक उमेदवार म्हणून नावे चर्चेत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत. उमेदवारीसंबंधित ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तिकीट कोणाला मिळेल याच्यापेक्षा या मतदार संघातून आपला खासदार निवडून जाणे महत्वाचे. आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे वर्चस्व राहणार, असा दावा त्यांनी केला.

RELATED ARTICLES

Most Popular