27.7 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeKokanनागपूर जंक्शन ते मडगाव या विशेष रेल्वेगाडीला मिळाली मुदतवाढ

नागपूर जंक्शन ते मडगाव या विशेष रेल्वेगाडीला मिळाली मुदतवाढ

विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला २६ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिपावलीच्या व नाताळच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी जानेवारी २०२३ पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते.

विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला २६ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या विशेष गाडीला पेण, मनमाड जंक्शन, पाचोरा जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, जळगाव जंक्शन, नांदुरा, शेगांव, मूर्तीजापूर थांबा मंजूर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, रस्ते वाहतूक दळणवळण महामार्ग राजमार्ग सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनसह चालवण्याचे रेल्वेचे धोरण आहे. यानुसार ‘कोरे’ मार्गे धावणाऱ्या या आणखी दोन एक्सप्रेस गाड्या विद्युत ट्रॅक्शनवर चालवल्या जाणार आहेत. यातील एक एक्सप्रेस गाडी गुरुवारपासून विजेवर धावू देखील लागली आहे. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या पोरबंदर – कोचुवेली, तसेच जामनगर – तिरूनेलवेली या दोन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचा डिझेल इंजिनवरील प्रवास आता संपणार आहे. याबरोबरच कोकण रेल्वे प्रशासन आता थेट विदर्भ मडगाव गाडीबरोबरच विद्युत इंजिनच्या गाड्याही वाढवून प्रवास अधिक सुखकर व जलद व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे.

RELATED ARTICLES

Most Popular