24.4 C
Ratnagiri
Friday, December 8, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeEntertainmentनवीन वर्षाच्या स्वागतासाठी, विकी आणि कतरिना दिसले घाईत... !

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी, विकी आणि कतरिना दिसले घाईत… !

ती न तपासणी करता, विमानतळाच्या आत गेली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी तिला म्हणाले, 'मॅडम चेकिंगसाठी थांबा'.

बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. सोशल मीडियावर या जोडप्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही नवीन वर्ष साजरे करण्यासाठी कुठेतरी निघून जात असल्याचे दिसत आहे. या दरम्यान कतरिना खूप पटकन घाईमध्ये दिसली. ती न तपासणी करता, विमानतळाच्या आत गेली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले पोलीस अधिकारी तिला म्हणाले, ‘मॅडम चेकिंगसाठी थांबा’. हे ऐकून कतरिना परत आली आणि चेकिंगची प्रक्रिया पूर्ण केली.

कॅटरिनाने काल रात्री २५ डिसेंबर सासरच्यांसोबत ख्रिसमस साजरा केला. कतरिनाने या सेलिब्रेशनची खास झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवली. या फोटोंमध्ये तिचा पती विकी कौशलही दिसत होता. याशिवाय विकीचा भाऊ सनी कौशल आणि कतरिनाची बहीण इसाबेल कैफ तसेच विकीचे आई-वडीलही उपस्थित होते. हे फोटो शेअर करताना कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मेरी ख्रिसमस’. तो एक परिपूर्ण कौटुंबिक छायाचित्र होता.

कतरिनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी काही यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की कतरिना जाणूनबुजून अशा कोनात उभी होती जिथून तिचा बेबी बंप दिसत नव्हता. यासोबतच कतरिनाने ख्रिसमस ट्रीवर एक फोटोही टाकला होता ज्यावर विकी तिला मागून मिठी मारत आहे. या फोटोमध्येही लोकांना कतरिनाचा बेबी बंप दिसला.

कॅटरिना आणि विकीने गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट येथे लग्नगाठ बांधली. दोघे २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते. वर्क फ्रंटवर, कतरिना शेवटची ‘फोन भूत’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत दिसली होती. ती लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. तर विकी ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘गोविंदा नाम मेरा’मध्ये शेवटचा दिसला होता. याशिवाय विकी ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील अनटाइटल्ड चित्रपटात दिसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular