30.6 C
Ratnagiri
Sunday, April 14, 2024

अजय देवगणने ‘मैदान’मध्ये केला अप्रतिम अभिनय

2019 मध्ये अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाची...

सिडकोला कोकणातून हद्दपार करणारच, खा. राऊतांचा निर्धार

गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव...

डिझेल विक्री बंद ठेवल्याने मच्छीमार संस्थांचा तोटा

पेट्रोलपंपावरून ९ येणाऱ्या टँकरद्वारे मिरकरवाडा बंदरावर अनधिकृतपणे...
HomeEntertainmentव्हर्सेटाईल विक्रम गोखले यांचे निधन, पंतप्रधान झाले व्यक्त

व्हर्सेटाईल विक्रम गोखले यांचे निधन, पंतप्रधान झाले व्यक्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोखले यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची तब्ब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन-तीन दिवस त्यांच्या निधनाच्या देखील अफवा पसरत होत्या. परंतु, त्यांच्या कुटुंबाने मात्र त्याला नाकारत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगितले. काल व्हेंटीलेटरवर असलेल्या या महान अभिनेत्याचे काल निधन झाले. अनेक स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोखले यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले विक्रम गोखले हे मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील व्हर्सेटाईल अभिनेते म्हणून त्यांचे नाव आदरानं घ्यावे लागेल, ते एक सर्जनशील अभिनेते होते. त्यांनी केलेल्या भूमिका, त्यांचे विविध रोल्स हे आपल्या कायम स्मरणात राहतील याबद्दल शंका नाही. मी त्यांच्या निधनानंतर खूप अस्वस्थ झालो आहे. मला मोठा धक्का झाला बसला आहे. मोदी यांच्या त्या व्टिटलाही अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

विक्रम गोखले यांचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरुन निघणारी आहे. मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील मोठमोठया सेलिब्रेटींनी गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.

मराठी मनोरंजन विश्वात तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं मराठी – हिंदी चित्रपट विश्वाला मोठा हादरा बसला असून, अतोनात नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular