24.4 C
Ratnagiri
Friday, December 8, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeKokanमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३ ते ६ डिसेंबर कोकण दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ३ ते ६ डिसेंबर कोकण दौरा

राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौऱ्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे अनेक पक्षांचे अध्यक्ष, कार्यकर्ते विविध जिल्ह्यांच्या गाठीभेटी घेताना दिसत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकणात येणार आहेत. राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्ह्याचा दौऱ्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. ते या दौऱ्यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून पक्षसंघटन वाढीसाठी विशेष कानमंत्र देऊन प्रयत्न करणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर तसेच संपूर्ण जिल्ह्यात कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांचा ३ ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये झंझावाती दौरा करणार असून मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. राजापूर कार्यालयाचे उद्घाटन, राजापूर येथे विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी बैठक होणार आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला देखील महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यादरम्यान कोणकोणत्या पक्षातील नाराज मनसेच्या गळाला लागतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी पदाधिकारी झटताना दिसत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यावेळी दोनशे महिलांचा प्रवेश होणार आहे. सायंकाळी ४ वा. लांजा बाजारपेठ येथे अजिंक्य हॉलमध्ये तालुक्याची बैठक़ होणार आहे. दि. ४ रोजी सकाळी ११ वा. रत्नागिरी विश्रामगृह येथे मान्यवरांच्या भेटीगाठी होतील. त्यानंतर जुनामाळ नाका येथे रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रत्नागिरी विश्रामगृह येथे विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ५ वा. देवरूख येथे गडकरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी कार्यालयाचे उद्घाटन होईल व संगमेश्वर विधानसभा पदाधिकाऱ्यांची बैठक होईल.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून तालुका-तालुक्यात नियोजनाच्या बैठका सुरू आहेत व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular