24.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriरत्नागिरी विमातळावरून नियमित प्रवासी विमानसेवा लवकरच होणार सुरू

रत्नागिरी विमातळावरून नियमित प्रवासी विमानसेवा लवकरच होणार सुरू

केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांना अशी ग्वाही दिली आहे.

सिंधुदुर्ग पाठूपाठ आत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील देखील विमानसेवा सुरु होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विमानसेवेचा उपयोग केवळ मंत्री महोदायांसाठी केला जात होता. परंतु, आत्ता सामान्य नागरिकांसाठी देखील हि विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

रत्नागिरी विमातळावरून नियमित प्रवासी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य देऊ तसेच महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या मागण्या व प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्यांसमवेत दिल्ली येथे संयुक्त बैठक करू. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांना अशी ग्वाही दिली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ज्योतिरादित्य सिंधीया यांची त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या प्रश्नांसंबंधी निवेदन देऊन चर्चा केली त्या प्रसंगी ते बोलत होते. विशेषतः रत्नागिरी विमानतळ प्रवासी सेवेसाठी कार्यान्वित करणे, नाशिक, कोल्हापूर येथून नवीन मार्गावर विमानसेवा, जळगाव विमानसेवा सुरू करणे, औरंगाबाद-पुणे हवाई सेवा, अकोला, चिपी विमानतळाबाबतही चर्चा करण्यात आली.

शिर्डी विमानतळावरून कृषी उत्पादनांची वाहतूक वाढवण्यासाठी विशेष व्यवस्था, सर्व विमानतळावर कार्गो टर्मिनलची उभारणी या मागण्याही या वेळी मांडण्यात आल्या. सोलापूर विमानतळावरून नियमित प्रवासी सेवा सुरू करण्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणीही ललित गांधी यांनी केली. रत्नागिरी मधील विमानसेवा सुरु झाल्या तर स्थानिक व्यापाऱ्यांसाठी  एक प्रकारची पर्वणीच ठरणार आहे. आंबा व्यवसाय देखील देश विदेशात विक्रीसाठी पाठवणे सोपे होईल. आणि स्थानिकांना देखील रोजगार प्राप्त होईल.

RELATED ARTICLES

Most Popular