24.8 C
Ratnagiri
Thursday, January 2, 2025

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक ! राजन साळवी

'सरकार बदलले आणि मला दिलेली वाय प्लस...

मुंबईकर महिलांचा जबरदस्त पराक्रम स्थानिक व्यापाऱ्याला खरपूस चोप!

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत...

पालकमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच रत्नागिरीत सामंत X कदमांमध्ये चुरस?

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर...
HomeRatnagiriबावनदीवरील पुलाच्या बांधकामावरुन ठेकेदार कामगारांमध्ये जोरदार हाणामारी

बावनदीवरील पुलाच्या बांधकामावरुन ठेकेदार कामगारांमध्ये जोरदार हाणामारी

यापुर्वी हे काम इगल कंपनीनचे ठेकेदार मुकेश मंडळ यांना दिलेले होते.

तालुक्यातील बावनदी येथील पुलाचे अर्धे काम इगल कंपनीने दुसऱ्या ठेकेदाराला दिले. या रागातून दोन गटात राडा झाला. यामध्ये एकजण जखमी झाला असून ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मंडळ व अन्य तीन अनोळखी असे संशयित आरोपी आहेत. ही घटना रविवारी (ता.७) रात्री सव्वा आठच्या सुमारास बावनदीचे पात्र, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इम्तीयज आतम जलीम शेख (मूळ रा.बिहार सध्या रा. बावनदी पुलाजवळ, रत्नागिरी) यांनी बावनदी येथील पुलाचे पुर्वेकडील पिलरचे बांधकाम इगल कंपनीकडून घेतलेले आहे.

यापुर्वी हे काम इगल कंपनीनचे ठेकेदार मुकेश मंडळ यांना दिलेले होते. परंतु कामास मुकेश मंडल यांच्याकडून विलंब होत असल्याने इगल कंपनीने पुलाचे अर्धे काम फिर्यादी इम्तीयज शेख यांना दिले. याचा राग मनात धरुन संशयित मुकेश मंडल यांनी शिवीगाळ करुन लोखंडी पाईप व सळीने शेख यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच शेख यांना सोडविण्यास गेलेले काम गार रामबाबू कुशवाह, विशिम शेख, मोहम्मद ऐनुला शेख यांना ही मारहाण करुन गर्डरचे काम तूच करणार काय तु बिहारी तू इथून पळून जा नाहीतर तुला मारुन टाकीन अशी धमकी संशयितांनी दिली. या प्रकरणी इम्तीयज शेख यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान दोन गटामध्ये झालेल्या या मारहाणीचे पडसाद उमटले असून बिहारी ग्रुपचे कामगार उत्तराखंड येथील ठेकेदार कामारावर उमटले आहेत. फिर्यादी सोनु साधू रॉय (रा. उत्तराखंड, सध्या रा. बावनदी पुलाजवळ, रत्नागिरी) यांच्यावर उमटले. रॉय यांनी डिसेंबर २०२३ ला निवळी बावनदी येथील रस्ता रुंदीकरणाचे पुलाचे पिलरचे इगल कंपनीकडून काम घेतलेले आहे. तसेच पुलाचे पलीकडील पिलरचे काम बिहारी लोकांनी घेतलेले आहे. रविवारी रॉय हे जेवण बनवत असताना नादीपात्राचे भागात जोरजोरात आरडा-ओरडा व शिवीगाळ केल्याचा आवाज येऊ लागल्याने सोनू रॉय काय प्रकार आहे.

हे बघण्यासाठी गेले असता रॉय यांचे कामगार आणि नदी पलिकडील पुलाचे काम करणारे बिहीरी ग्रुपचे कामगार आपसात एकमेकांना शिवीगाल करुन लोखंडी शिग व पाईपने मारहाण करत होते. या प्रकरणी रॉय यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी बिहारी तीन ते चार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस अमंलदार करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular