सगळीकडे विकासकामे होत असतानाच विकासाच्या दृष्टीकोनातून राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षे मागे पडलेला असून येथे चांगला उमेदवार असावा या प्रतिक्षेत आम्ही होतो. तसा उमेदवार किरण सामंत यांच्या रूपात लाभला असून येथील सूज्ञ मतदार त्यांना विजयी करून विधानसभेत निश्चितच पाठवतील असा जोरदार विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी ओणी येथे महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला. महायुतीच्या सत्ता काळात मोठया प्रमाणावर विकासकामे मार्गी लागली. अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. लाडकी बहीण योजना असेल किसान सन्मान योजना असेल किंवा अन्य योजना असतील त्या थेट जनतेपर्यंत पोहोचल्या. कोकणातील विकासकाम ांसाठी सुमारे साडेपाच हजार कोटींचा निधी महायुतीने दिला. जिल्हयातील रेल्वेस्टेशनच्या विकासाची कामे मार्गी लागली असे ना. चव्हाण म्हणाले. ओणी येथील गजानन मंगल कार्यालयात गुरूवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा झाला. त्यावेळी महायुतीच्या नेत्यानी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना आपल्या सत्ता काळात मार्गी लागलेल्या विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा सादर केला. त्याचवेळी विरोधकांचा खरपूस समाचार देखील घेतला.
दिग्गजांची उपस्थिती – या प्रसंगी व्यासपिठावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना. उदय सामंत, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदास धैर्यशील माने, माजी आम दार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बंटी वणजू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडित, ज्येष्ठ नेते राजन देसाई, अतूल काळसेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शिंदेंची टीका – महायुतीचे उमेदवर किरण सामंत यांच्या खास प्रचारासाठी ठाण्याहूने आलेल्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. म ागील सव्वा दोन वर्षात आम्ही केलेली विकासकामे असतील किंवा यशस्वी राबविलेल्या योजना असतील त्या आम्ही सांगतो. तुम्ही अडीच वर्षात काय केलेत ते समोर येऊन सांगा असे आव्हान डॉ. शिंदे यांनी दिले. अडीच वर्षाच्या सत्ता काळात त्यांनी स्वतःसह राज्याला बंद केले होते असा खोचक टोला त्यांनी लगावला. केंद्रासह राज्यात डबल इंजीनचे सरकार आहे. राज्यात एक लाख १७ हजार कोटीची गुंतवणूक आली आहे असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. कोकणात पर्यावरणपूरक असे प्रकल्प आले पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामंतांचा विरोधकांवर निशाणा – महायुतीच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नाणार येथील रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्प ज्यांनी मुख्यमंत्री असताना बारसू गावात आणला, बारसूत तो प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आणि जागा सुचविली तेच आता रिफायनरीविरोधात भूमिका घेत असल्याची टीका ना. सामंत यांनी केली. मागील पंधरा वर्षात राजापूरचा विकास झाला नाही. मात्र येथील विकासकामे मार्गी लागावीत म्हणून आपले बंधू आणि महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी सातत्याने प्रयत्न केले. महाम ार्गावरील वाटूळ येथील मंजूर झालेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंवा लांजा रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात होणारे रूपांतर असेल हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण सामंत यांचा मोठा वाटा आहे, अशा शब्दात त्यांनी किरण सामंत यांचे कौतुक केले. या मतदारसंघात सकारात्मक काम करणारा लोकप्रतिनिधी हवा असून किरण सामंत हे आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. जर स्थानिक लोकांचा विरोध असेल तर कोणताही प्रकल्प लादणार नाही. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रकल्प लादणार नाही. इकडची बेरोजगारी दूर करण्यासाठी चांगले प्रकल्प निश्चितच आणले जातील याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
खा. मानेंनी घेतला खरपूस समाचार – उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खास कोल्हापूरहून आलेले, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी महायुतीचे उमेद्वार किरण सामंत यांच्या कार्यपध्दतीचा गौरव केला.. आपल्या जोरदार भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. किरण सामंत यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवारांनीही गुवाहाटीचे तिकिट काढलेले होते. मात्र गाडीत बसता बसता ते थांबले असा खळबळजनक आरोप त्यांनी कोणाचे नाव न घेता केला
विकासाचे आश्वासन – यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी मार्गदर्शन करताना या विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी आपण सदैव कटिबध्द राहू अशी ग्वाही दिली. माझा शब्द हेच माझे वचन असल्याचे ते म्हणाले.. ओणीत महायुतीच्या झालेल्या या मेळाव्याला चांगली उपस्थिती लाभली होती.