केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे पाच हजार पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही कोकण प्रांत आजही तहानलेलाच आहे. रत्नागिरी ठाणे, रायगड, आणि पालघर अशा चार जिल्ह्यांतील ४९५ गावे-वाडांना ११४ टैंकर्सन पाणीपुरवठा सुरू आहे. काही ठिकाणी पाणीटंचाई असतानाही तेथे टँकर सुरू झालेले नाहीत. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोकणात आजही लाखो नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. कोकणातील रत्नागिरी ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग हे पाचही जिल्हे अतिपर्जन्यमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये येतात. येथे तीन हजार मि. मी. हून अधिक पाऊस दरवर्षी होती, पावसाळ्यात अनेक भागांत पुरामुळे जीवित व वित्तहानी होते; मात्र त्यानंतर चारच महिन्यांत हे पाणी तळ गाठते आणि पाचही जिल्ह्यांना पाणी टंचाईची झळा बसू लागतात.
कोकणातात फेब्रुवारी आणि मार्चपासूनच पाणीटंचाई तीव्र होते. नदी, तलाव आणि विहिरींनी तळ गाठल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषकरून महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. २८ एप्रिलपर्यंतच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्यातील ३५ गावे आणि १२७वाड्यांवर ४७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात २७ गावे आणि १४६ वाक्यांवर ३० टँकरने, सनागिरी जिल्ह्यात २० गावे आणि ५३ वाड्यांवर ९ टँकरने, पालघर जिल्ह्यात १७ गावे आणि ७० वाडांवर २८ टैंकरने अशा एकूण १९० गावे आणि ३९६ वाडयांवर ११४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात दोन शासकीय, तरं ११२ खासगी टेंकर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र सध्या कुठेही टँकरने पाणीपुरवठा सुरू नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यापाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
२९ एप्रिलपर्यंत कोकणातील पाचही जिल्ह्यांमधील जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या ११ मोठ्या धरणांमध्ये ३८ टक्के, मध्यम ८ घरांमध्ये ४६ टक्के आणि छोटया १५४ धरण प्रकल्पांमध्ये ५७ टक्के उपयुक्त साठा आहे. कोकणात लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण १७३ धरणे असून या धरणांमध्ये सरासरी २४ टक्के साठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणांमध्ये फक्त २८ टक्के साता होता. त्यामुळे बावर्षी धरणांमधील साठा मेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. ‘जलजीवन’च्या ३५ टके योजनाच पूर्ण, कोकणात जलजीवन मि शनच्या रायगड जिल्हातील १,४९६ पैकी ७५१ योजना पूर्ण झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याच्या ७२० पैकी १६९, रत्नागिरी जिल्ह्यात १,४३२ धरणांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा, कोकणातील स्थिती पैकी ४३९, पालघर जिल्ह्यातील ७०२ पैकी १४०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१७ पैकी २५७योजना पूर्ण झाल्या आहेत. कोकणात एकूण ५ हजार ६७ योजना मंजूर असून त्यापैकी १,७५६ योजना अर्थात ३५ टक्के योजनाच पूर्ण झाल्या आहेत.