चालक-वाहकांची कमतरता आणि गाड्यांची अपुरी संख्या यामुळे गर्दीच्या ऐन उन्हाळी हंगामामध्ये राजापूर आगाराचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामध्ये राजापूर आगारातील चार गाड्या खेड आगारामध्ये पाठविण्याची विभाग नियत्रकांनी व्लेिल्या सूचनेची भर पडली आहे. सर्वाधिक प्रवासी भारमान असणाऱ्या राजापूर-रत्नागिरी मार्गावरील गाड्याही राजापूर आगाः प्रशासनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ऐन हंगामामध्ये प्रवासी भारमानाच्या राजापूर आगाराचे नियंजन कोलमडले आहे. याबाबत प्रवाशंमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवासी भारमानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी व चिपळूण आगारानंतर राजापूर आगाराची गगना होते. राजापूर आगाराच्या लांब पल्ल्यांसह ग्रामीण भागातील सेवेलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, गेले वर्षभर राजापूर आगाराचे नियोजन कोलमडले आहे.
राजापूर आगारात चालक व वाहकांची मोठी कमतरता असून, दररोज ५० ते ६० चालक-वाहकांना डबल ड्यूटी करावी लागत आहे. यामुळे एसटींवर ओव्हरटाईमचा भुर्दंड पडत आहे. अपुऱ्या गाड्या, अपुऱ्या चालक-वाहकांमुळे अनेक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजापूर-रत्नागिरीबरोबरच ग्रामीण भागातील अनेक फेऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये राजापूर-ताम्हाणे, कुंभवडे, पाचल आंबा, ओझर, खारेपाटण, आंबोळगड यांसारख्या फेऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी मार्गावरील सकाळी ८.३०, ८.५०, १०, दुपारी २, २.३०, ३.३० या नियमित व चांगल्या भारमान देणाऱ्या राजापूर-रत्नागिरी मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. लग्नाच्या वऱ्हाडासाठीही गाड्या मिळत नाहीत.
चार गाड्यांसह चालक-वाहक खेड आगाराला – दैनंदिन शेड्युलसाठी राजापूर आगारात ६० गाड्यांची आवश्यकता असताना सध्या केवळ ५४ गाड्या उपलब्ध आहेत. त्यातून चार गाड्या उन्हाळी हंगामासाठी खेड आगारात पाठविण्याचे आदेश विभाग नियंत्रकांनी दिले आहेत. या चार गाड्यांबरोबर आठ चालक-वाहकही द्यावे लागणार आहेत. त्यातून राजापूर आगाराचे मे महिन्यातील गर्दीच्या कालावधीमध्ये नियोजन कोलमडले आहे.