ग्रामपंचायतीं ग्रामसभेच्या ठरावा ‘ग्रामपंचायतींच्या विरोधात सर्वेक्षण ग्रामसभेच्या होऊ देऊ नका. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष रिफायनरी होऊच देणार नाही,प्रकल्पात जमीन घोटाळा झाला आहे. गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत केला.’राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्रीना. उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यासाठी बुधवारी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी राजापूर, पोलीस निरीक्षक राजापूर आदींच्या उपस्थितीत रिफायनरी विरोधी संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

अल्पकालावधीत बैठक:- जिल्हाधिकारीयांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी दि. १० एप्रिल रोजी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अंतर्गत गावातील जनतेला बुधवारच्या बैठकीचे निमंत्रण पाठविले. मात्र ते निमंत्रण दि. ११ एप्रिल रोजी संबंधितांना मिळाले. त्यामुळे बहुतांश पदाधिकारी या बैठकीस हजर राहू शकले नव्हते, याची माहिती रिफायनरी विरोधी नेते सत्यजित चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.

विविध मुद्यांचा आढावा:- राजापूर तालुक्यातील ज्या भागात रिफायनरी प्रस्तावित आहे त्या भागात मोठ्या प्रमाणात जागतिक वारसा असणारी कातळशिल्प आहेत. जामनगरचा आंबा केवळ रिलायन्सचा आहे. तेथे कुठलाही सामान्य शेतकरी आंबा पिकवत नाही. सी.एस.आर. अॅटक्टिव्हिटी म्हणून आंबा पिकवला जातो. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार आहे असे सांगून माहूल येथील रिफायनरीमुळे वातावरण कसे बिघडले आहे याचा असे दाखला रिफायनरी विरोधकांनी दिला.

सर्वेक्षणाला विरोध:- प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा ठराव करुन रिफायनरीला विरोध केला आहे. त्यामुळे रिफायनरी सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध आहे. केंद्रस्तरावर रिफायनरीच्या काहीही हालचाली सुरू नाहीत. जमिनीत पुढाऱ्यांचा इंटरेस्ट असल्याने रिफायनरीसाठी जोर लावला जात आहे, असा आरोप यावेळी रिफायनरी विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आंदोलकांची मुस्कटदाबी असेही ठणकावून सांगितलं.

अन्य लोकांना अटकाव:- या संवाद बैठकीत निमंत्रकांपैकी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती, नाणारचे अध्यक्ष अशोक वालम, बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना अध्यक्ष अमोल बोळे गैरहजर होते. तर सत्यजित चव्हाण, नरेंद्र जोशी, सतीष बाणे, कमलाकर गुरव, काशिनाथ गोर्ले, दिपक जोशी, विनेष वालम, संजय राणे, सुविधा राणे,. नेहा दुसनकर, प्रकाश ठकरूल, रुपेश अवसरे, सौ. मोंडे, नंदु कुलकर्णी आदी उपस्थित होते. नाणार असो की बारसू -सोलगाव येथे रिफायनरी विरोधी आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू होते. तरीही प्रशासनाने आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. रिफायनरी आंदोलकांची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष रिफायनरीला आमचा कायम विरोध आहे. या भागातील कातळशिल्प, आंबा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करु पण रिफायनरी होऊ देणार नाही