25 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriबस वाहतुकीमधील सवलतीचे स्वागत, पालकमंत्री सामंत यांचे आभार

बस वाहतुकीमधील सवलतीचे स्वागत, पालकमंत्री सामंत यांचे आभार

पालकमंत्री सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीतर्फे आभार मानण्यात आले आहेत.

महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शहरी बस वाहतुकीमध्ये ५० टक्के सवलत देण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांचे शिवसेना महिला आघाडीकडून विशेष आभार मानण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत चालवण्यात येणाऱ्या शहरी बस वाहतुकीत ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये शासनाकडून महिलांना देण्यात येणाऱ्या ५० टक्के सवलती बंद होत्या. तालुक्यातून येणाऱ्या एसटीमध्ये महिलांना आणि ६५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत देण्यात येत आहे, तर ७५ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना एसटी बसमधून मोफत सवलत देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत चालवण्यात येणाऱ्या शहरी वाहतुकीच्या बसमध्ये या सवलती नागरिकांना मिळत नव्हत्या. याबाबत शिवसेना महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, महिला विभागप्रमुख विद्या बोंबले, अपर्णा बोरकर, रिया साळवी, शुभांगी पंड्ये, फरजाना डांगे आणि रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी ही बाब पालकमंत्री सामंत यांच्याकडे केली होती. पालकमंत्री सामंत त्यांनी क्षणाचा विचार न करता याची माहिती संबंधित विभागाकडून जाणून घेतली आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शहरी बस वाहतुकीच्या सवलतीबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती घेत तत्काळ शहरी बसमध्ये सवलत देण्याच्या सूचना दिल्या. आता रत्नागिरी ग्रामीण भागातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना शहरी बसवाहतुकीमध्ये या सवलतीचा लाभ घेता येणार असून, योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे. रत्नागिरीमधील महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न पालकमंत्री सामंत यांनी मार्गी लावून पुन्हा आपल्या कामाची झलक दाखवली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल शिवसेना महिला आघाडीतर्फे आभार मानण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular