डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांसह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा जागतिक स्तरावर सन्मान होत आहे. या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारतीय संसदेच्या राज्यसभा या सभागृहामध्ये भारतीय संविधानावर गौरवशाली चर्चा होत असताना दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अपमान करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. अमित शहांनी बाबासाहेबांचा अपमान केला असून तो कदापि सहन केला जाणार, नाही असा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चा संपल्यानंतर अमित शहांचा निषेध करणारे निवेदन मोर्चेकरांच्यावतीने शासनदरबारी सादर करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष एल. व्ही. पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीपक राऊत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी कॉग्रेसचे इंडियाचे कोकण प्रदेशाध्यक्ष एल. व्ही. पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दीपक राऊत, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ नेते बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी प्रमोद शेरे, बी. के. पालकर, दीपक जाधव, प्रकाश य. पवार आदि उपस्थित होते.