एसटी संप अजूनही जिल्ह्यामध्ये सुरु आहे. संपामध्ये सहभागी न झालेले किंवा माघारी आलेले कर्मचारी बसच्या काही फेर्या घेऊन जात आहेत. पण काहीवेळा अज्ञाताकडून होणारा हल्ला त्यामुळे चालकांना सुद्धा जीव मुठीत घेऊन सेवा द्यावी लागत आहे. तर काही वेळेला घडणाऱ्या अपघातामुळे सुद्धा वाहन चालकांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
खेड चिपळूण या एसटी बसची धडक रस्ता ओलांडणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला बसून जखमी झाल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात मंगळवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास वेरळ नजीकच्या खेड रेल्वे स्थानक फाटा येथे घडला होता.
पंढरीनाथ दादासो निकम रा. चिपळूण असे त्या गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. तर सुहासिनी उदय पवार रा. कोरेगाव विठ्ठल वाडी खेड असे बसच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या खेड बस स्थानका मधून सुटलेल्या चिपळूण खेड बस क्र.एम.एच. २० बी एल ०९०१ या बसने प्रवास करून त्या खेड रेल्वे स्थानक फाटा येथे उतरून थांबलेल्या बस समोरून रस्ता ओलांडत असताना त्याच बसचा चालक निकम याने अचानक बस सुरू केल्याने त्या बसची धडक पवार या महिलेला बसली त्यात तिला दुखापत झाली.
काही वेळेला प्रवाशाच्या घाईगडबडीमुळे असे अपघात घडून येतात तर काही वेळा अशा अपघातांसाठी बेदरकारपणे वाहन चालवणारे चालक जबाबदार ठरतात. त्यामुळे काही अशा चालकांमुळे इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांचा नावाला पण डाग लागतो.