31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...
HomeRatnagiriमहाविकास आघाडीकडून नेमके कोण लढणार? - युतीचे उमेदवार असू शकतात ना. उदय सामंत

महाविकास आघाडीकडून नेमके कोण लढणार? – युतीचे उमेदवार असू शकतात ना. उदय सामंत

पुढच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप अशी युती राहिली तर रत्नागिरी मतदार संघातून ना. उदय सामंत हे युतीचे उम दवार असू शकतात. हे जवळ जवळ निश्चित आहे. या निवडणुकीत म हाविकास आघाडी कायम राहिली तर त्यांचा उमेदवार कोण असणार? याची आता चर्चा सुरू झाली आहे.रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री असलेले ना. उदय सामंत हे आतापर्यंतच चार वेळा या मतदार संघातून निवडून गेले आहेत. यापैकी दोन वेळा ते राष्ट्रवादीकडून लढले होते तर दोन वेळा शिवसेनेकडून लढले होते. आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत सत्ताही स्थापन केली आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतले मतदार सामंतांनाच पुन्हा स्वीकारणार की वेगळा विचार करणार याबाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जात आहेत.

२००४ च्या निवडणुकीत ना. सामंत अनेकांचे अंदाज चुकवून पहिल्यांदा निवडून आले होते. या म तदारसंघात त्यांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळ माने यांचा पराभव केला होता. त्यानंतर. सलग ४ वेळा त्यांनी विजय मिळविला. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील लढतीचे स्वरुप नेमके कसे असेल, आताच अंदाज बांधणे शक्य होणार नाही. ना. उदय सामंत यांच्याकडे कार्यकर्त्याची मोठी फळी आहे. त्यांचे उद्योजक असलेले ज्येष्ठ बंधू किरण उर्फ भैय्या सामंत त्यांच्यासाठी किंगम करची भूमिका बजावताना अनेकदा पहायला मिळाले आहेत.

विजयाची समीकरणे तयार करण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.रत्नागिरी मतदार संघावर ना. सामंत यांची चांगली पकड असल्याचे सांगितले जाते. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सामंत बंधूंना काही नव्याने समीकरणेही तयार करावी लागणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून नेमका कोण उम दवार असणार, महाविकास आघाडी होणार की नाही यावर खूप काही गोष्टी अवलंबून राहणार आहेत. रत्नागिरीतून गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र विद्यमान आमदारांची जागा बदलण्याची खेळी पक्ष करेल असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतून कोण उमेदवार असणार, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.महाविकास आघाडी किंवा ठाकरे गटाच्या उमेदवारास प्रचंड संघर्ष करावा लागू शकतो. रत्नागिरीतला कट्टर शिवसैनिक नेमका कोणासोबत आहे हे या निवडणुकीत समोर येणार आहे. दोन काँग्रेस महाविकास आघाडीसाठी पूर्ण ताकदीने काम करणार का यावरही खूप काही अवलंबून राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular