32.6 C
Ratnagiri
Sunday, June 4, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRatnagiriलांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येणारः आमदार राजन साळवी

लांजा-राजापूर-साखरपा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येणारः आमदार राजन साळवी

सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत लांजा-राजापूर-साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असणार आहोत असे सांगताना मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आम जनता या सर्वांच्या विश्वास आणि ताकदीच्या बळावर पुन्हा एकदा याच मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास लांजा- राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी लांजा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शिवसेना पक्ष सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजन साळवी हे २०१४ ला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते पुढे म्हणाले की, माझी जन्मभूमी ही रत्नागिरी जरी असली तरी कर्मभूमी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघ आहे. सन २००९ पासून सलग १४ वर्षे या मतदारसंघाचा आपण आमदार म्हणून कार्यरत आहोत. मतदारसंघातील शिवसैनिक व आम जनतेच्या आशीर्वादाने आपण गेली १४ वर्षे आमदार म्हणून या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहोत.आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा, मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular