25.6 C
Ratnagiri
Friday, December 8, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRajapurकोकणाचे भवितव्य हे दहा जागा मालक ठरवू शकत नाही -रिफायनरी विरोधक सरपंच अमोल बोळे

कोकणाचे भवितव्य हे दहा जागा मालक ठरवू शकत नाही -रिफायनरी विरोधक सरपंच अमोल बोळे

रिफायनरीच्या विरोधात ग्रामपंचायतीनी केलेल्या ग्राम सभेचा ठराव मान्य नसतील तर उद्योगमंत्री यांनी ग्राम पंचायत बरखास्त करावी. १० जागा मालक कोकणाचे भवितव्य ठरवू शकत नाहीत. कोकणचे रासायनिक गटार होऊ नये म्हणून रिफायनरीला आमचा विरोध विरोध कायम असणार असे प्रतिपादन बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना अध्यक्ष अमोल बोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्यात रिफायनरी संदर्भात शेतकरी यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यावर सोपवली आहे. नाटे येथे १७ ठिकाणी सॉईल टेस्टिंगसाठी बोअर मारण्याचे काम पूर्ण झाले असून १०० पैकी १७ बोअर मारुन झाल्या आहेत. १९९ पैकी ३६ संमतीपत्र मिळाली आहे. उर्वरित संमतीपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करण्याचें आदेश देण्यात आले त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमोल बोळे बोलत होते.

ग्रा.पं. बरखास्त करावी :- बारसू -सोलगाव पंचक्रोशीत रिफायनरी नको म्हणून प्रस्तावित कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या ग्राम सभेचा ठराव मंजूर करण्यात आला. तरीही सरकार रिफायनरीसाठी आग्रही असेल आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांना ग्राम सभेचा ठराव मान्य नसेल तर त्यांनी ग्रामपंचायत बरखास्त कराव्यात असे आवाहन बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना अध्यक्ष अमोल बोळे यांनी दिले.

जागा मालक भवितव्य ठरवणार? :- बारसू -सोलगाव पंचक्रोशीतील शेतकरी, कष्टकरी जनतेचा रिफायनरीला विरोध आहे. १० जागा मालक यांचे भांडवल करीत रिफायनरी दलाल आणि नेते रिफायनरीचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे १० जागा मालक कोकणाचे भवितव्य ठरवू शकणार नाहीत असे अमोल बोळे यांनी सांगितलं. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात प्रदूषण वाढणार आहे. कोकणाचे गटार होऊ नये म्हणून आम्ही रिफायनरीला विरोध करीत आहोत. यापुढेही कायम विरोध राहणार असल्याचे श्री. बोळे यांनी सांगितले. आमचा विकासाला विरोध नाही. तुम्हाला कोकणाचा विकास करायचा असेल तर प्रदूषण विरहित प्रकल्प आणा आम्ही त्याचे स्वागत करु असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular