23.9 C
Ratnagiri
Friday, February 7, 2025

कमी बजेटमध्ये प्रचंड कमाई करणारा साऊथचा अप्रतिम सस्पेन्स चित्रपट…

आजकाल, ओटीटीवर ॲक्शन थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड...

चिपळूण पंचायत समितीने थकवले १ लाख २१ हजार…

मार्च महिना जवळ आला की, सर्व आस्थापनांना...

कोळकेवाडीतील खोदकामांमुळे वाड्यांना धोका – पाणी योजनेसाठी काम

कोळकेवाडी धरणातून सायफनद्वारे तालुक्यातील अडरे, अनारी परिसरातील...
HomeKokanरिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासासाठी सज्ज होऊया – प्रमोद जठार

रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या विकासासाठी सज्ज होऊया – प्रमोद जठार

जो रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासाची गोष्ट करेल तोच आमचा पुढचा खासदार असेल असा एकमताने निर्धार आपण यानिमित्ताने केला पाहिजे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या माध्यमातून राजापूरमध्येच आता रिफायनरी प्रकल्प होणार हे अटळ असून या माध्यमातून येणाऱ्या विकास गंगेच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे आणि जो रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासाची गोष्ट करेल तोच आमचा पुढचा खासदार असेल असा एकमताने निर्धार आपण यानिमित्ताने केला पाहिजे असे प्रतिपादन देवगडचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी येथे केले.

त्यावेळी पुढे बोलताना जठार म्हणाले की, या रिफायनरीच्या माध्यमातून घराघरात रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र विकासाच्या पैशावर डल्ला मारायला काही मंडळी टपलेली आहेत. मात्र आता राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता कोणीही विरोध केला तरी प्रकल्प हा होणारच आहे. लोकहिताचे उपक्रम सुरू होतील. लवकरच आपण केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घेणार आहोत. आपल्याला काय हवय या सर्व गोष्टी आपण मागणार आहोत. येथील तरूणांना रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी आपण आग्रही राहणार आहोत.

आपल्या लोकांना यामध्ये प्राध्यानाने रोजगार मिळाला पाहिजे. आमची मुलं इथे नोकरीला लागली पाहिजेत. इथल्या प्रत्येक गावातील माणसाचा सहभाग असला पाहिजे. त्याचबरोबर हा प्रकल्प केवळ इंधन निर्मिती करणार नसून सहाशे बायो प्रोडक्ट यातून निर्माण होणार आहेत. शिवाय राणे साहेबांच्या खात्यामार्फत शंभर छोटे उद्योग या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. ज्यावेळी हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा इथला माणूस श्रीमंत झालेला आपल्याला याची देही याची डोळा पाहायचा आहे.

आता राजापूरात गंगा माईचे आगमन झाले आहे. सगळया कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणारा रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून विकास गंगा केंद्र सरकारच्या माध्यमातून परत येवू घातली आहे. तीचे स्वागत करून मृतपाय बनलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गला पुन्हा जिवंत करूया असा निर्धार करूया असे आवाहन जठार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular