25.2 C
Ratnagiri
Saturday, January 25, 2025

जिल्ह्यात घुसलेल्या बांगलादेशींचा शोध घेऊन वितरण मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशी घुसखोर...

मालगुंड होणार आता पुस्तकांचे गाव मराठी भाषामंत्री उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यातील पातील मालगुंड गावाला पुस्तकांचे गाव...

वाशिष्ठीतील गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री वाढवा आमदार निकम

वाशिष्ठो नदीतील गाळ उपसा कामासाठी पुरेसा निधी...
HomeMaharashtraतुमच्या राजकारणात आम्हा कलाकारांना का खेचता?अभिनेत्री प्राजक्ता माळीचा

तुमच्या राजकारणात आम्हा कलाकारांना का खेचता?अभिनेत्री प्राजक्ता माळीचा

सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, नाही तर माझ्या वकिलांच्या माध्यम ातून मी नोटीस पाठवेन.

आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही दुसऱ्या एका राजकाऱ्यावर टीका करताय. तुमचं जे काही चाललंय ते तुम्हाला लखलाभः पण या सगळ्यात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा यात काय संबंध? बीडमध्ये कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यावर भाष्य करताना कलाकारांवर गाडी का घसरते? अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं भाजप आमदार सुरेश धस यांना जाब विचारला आहे. सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, नाही तर माझ्या वकिलांच्या माध्यम ातून मी नोटीस पाठवेन, असा इशारा तिने दिला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर प्राजक्ता म ाळीने आपली बाजू मांडली आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेल्या विधानाचा मी निषेध करते. गेल्या दीड महिन्यापासून हा प्रकार सुरु आहे. तेव्हापासून मी अत्यंत शांततेने ट्रोलिंगला सामोरे जातेय.

माझी शांतता म्हणजे मूकसंमती नाही. तर हतबलता आहे. एक व्यक्ती काहीतरी बरळून जाते. त्यावर हजारो व्हिडीओ बनतात. एका सेलिब्रिटीला त्यावर बोलणं भाग पाडलं जातं. यावर प्रतिक्रिया येतात. महिलांची अब्रू निघत राहते आणि सर्वांच मनोरंजन होतं राहत. मला या चिखलांत दगड टाकायचा नव्हता. म्हणून मी शांत राहिले. एका सांस्कृतिक कार्यक्रमात काढलेला फोटो, ती आमची एकमेव भेट यावर खूप मोठा गदारोळ करण्यात आला. ही गोष्ट खोटी असल्याने त्यावर मी बोलली नाही. माझं कुटुंब, मित्र परिवार, महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. कोणीही माझ्यावर शंकेने पाहिले नाही. धीराने सामोरे जा, असं सर्वाने सांगितलं. लोकप्रतिनीधी यावर टिपण्णी करतात. यांना लोकांनी निवडून दिलंय. हे आपल्यावर चिखलफेक करतात. पण काल सुरेश धस यांनी वक्तव्य केल्याने आज मला बोलावं लागलं.

लोकप्रतिनिधीला लाखो लोकं फॉलो करतात. एखादी गोष्ट खरी असल्याचे ते. भासवतात, असे तिने यावेळी म्हटले. तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही कलाकार आहोत. या सर्वात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा संबंध काय? महिला कलाकारांचीच नाव का येतात? पुरुष कलाकारांची नाव का येत नाहीत. कष्ट करुन नाव कमावणाऱ्या महिलांच्या नावाची बदनामी का करता. त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिलांची नाव घेतली. कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, प्रेक्षकांचे मनोरंजन करणं हे कलाकारांचे काम आहे. मी याआधीही करत राहिले आणि पुढेही काम करत राहीनं, असे प्राजक्ता माळीने यावेळी म्हटलं. महिला म्हणून ही बाब मला अतिशन निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे शोभत नाही.

सुरेश धस यांनी माझी जाहीर माफी मागावी, असे ती यावेळी म्हणाली. तसेच महिलांनी महिलांच्या पाठीशी उभं राहायला हवं, पुरुष प्रधान संस्कृतीत त्यांच्यावर शिंतोडे उडवायला नको, असे आवाहन प्राजक्ता माळीने करुणा मुंडे यांना केले. मी करुणा मुंडे यांना आधीच नोटीस पाठवली आहे. यानंतर त्यांनी काही विधान केले नाही. सुरेश धस यांनी माफी मागितली नाही तर माझ्या वकिलांच्या माध्यमातून मी नोटीस पाठवेन. कलाविश्वात काम करणाऱ्या महिलांच्या वतीने मी लढणार असल्याचे प्राजक्ता माळीने म्हटले.

RELATED ARTICLES

Most Popular