26.4 C
Ratnagiri
Monday, October 13, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunगव्यांना पिटाळायचे की, वाघांना जंगलात सोडायचे ?

गव्यांना पिटाळायचे की, वाघांना जंगलात सोडायचे ?

कोयनेच्या प्रकल्पाच्या भागात गव्यांची संख्या वाढली आहे.

तालुक्यात गुढे येथे काही दिवसांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय रवींद्र पांडुरंग आग्रे यांचा मृत्यू झाला. कापसाळ येथे रस्त्यावर गव्याने वाहतूक अडवली होती. कुंभार्ली घाटातील जंगलातही गवे वाढले आहेत. जंगलभाग असलेल्या सावर्डे, असुर्डे, कामथे, तोंडली, तन्हाळी, कळंबट या भागात सर्रास गवे दिसतात. गवा हे वाघाचे मुख्य खाद्य असून, वाघांचा अभाव असल्याने या भागात रानगव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाघ आले तर जैविक साखळीचा समतोल साधला जाईल आणि वन्यप्राणी-मानव संघर्ष कमी होईल, असे काहींचे म्हणणे आहे. सह्याद्री या एकमेव व्याघ्रप्रकल्पात वाघाचे अस्तित्व नसल्याचे २०२२च्या व्याघ्रगणनेत स्पष्ट नमूद होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या भागात गव्यांची संख्या वाढली आहे. कोयनेच्या जंगलातील काही गवे खाली उतरले आहेत.

केंद्र सरकारने ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्पांमधून तीन नर व पाच मादी असे आठ वाघांना जेरबंद करून त्यांना सह्याद्रीत सोडण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी येथून पाच वाघ सह्याद्रीत सोडण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने यास परवानगी दिली आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील कोयना अभयारण्यात एक आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघ स्थायिक झाले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये स्थलांतर करून आलेला चौथा वाघ इथे स्थिरावल्याने या प्रकल्पाविषयीचा विश्वास वाढला आहे. गेल्या वर्षी त्याने चिपळूणच्या – तळसर भागात ही शिकार केली होती. यावर्षी पुन्हा शिरगावच्या हद्दीत वाघाचे ठसे आढळले आहेत. चौथा वाघ रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात भ्रमंती करत असल्याचे ठोस पुरावे वनविभागाकडे आहेत. सह्याद्रीत सोडण्यात येणाऱ्या वाघांपैकी एक वाघ रत्नागिरीत सोडला तर गव्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल.

RELATED ARTICLES

Most Popular