21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriदणदणीत मताधिक्क्याने ते विजयी होतील व पुन्हा केंद्रीय मंत्री होतील - आ. नितेश राणे

दणदणीत मताधिक्क्याने ते विजयी होतील व पुन्हा केंद्रीय मंत्री होतील – आ. नितेश राणे

"राणे साहेबांच्या विजयाचा गुलाल मतमोजणीच्या दिवशी आम्हीच उधळणार!

या लोकसभा निवडणुकीत ना. नारायण राणे साहेबांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ३ लाखांच्या घसघशीत मताधिक्क्याने विजय होणार आणि ही परशुराम भूमी त्यांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या शुभहस्ते समृध्द होणार” असे आत्मविश्वासपूर्ण प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै. ‘रत्नागिरी टाइम्स करिता आ. नितेश राणे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

कर्तबगार सुपूत्र ! – आ. नितेश राणे हे ‘कोकणचे कर्तबगार सुपूत्र’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राणे साहेबांना दीड लाखांचे घसघशीत मताधिक्क्य मिळेल व तितकेच म्हणजे दीड लाखांचे मताधिक्य रत्नागिरी जिल्ह्यातूनही मिळेल. अशा एकूण ३ लाखांच्या मताधिक्क्याने त्यांचा दैदिप्यमान विजय होईल” असा त्यांनी जणू मतदानाचा लेखाजोखा स्पष्ट केला.

फर्स्ट हँड इन्फरमेशन – आ. नितेश राणे हे या घडीला ना. नारायण राणेंच्या प्रचार मोहिमेचे सूत्रसंचालन करीत आहेत, त्यामुळे ते ‘फर्स्टहँड इन्फरमेशन’ देत होते. त्यांनी सांगितले, “संपूर्ण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात राणे साहेबांचा जबरदस्त करिश्मा आहे व त्यांच्या दैदिप्यमान विजयाचा ‘माहोल’ आतापासूनच तयार झाला आहे” असे त्यांनी निदर्शनास आणले.

तरुणांना रोजगार – आ. नितेश राणे उत्साहाने बोलत होते. त्यांनी सांगितले, “या परशुराम भूमीला सुबत्ता यावी, बरकत यावी व येथील भूमीपूत्रांच्या हातात बक्कळ उत्पन्न यावे असा राणे साहेबांचा सततचा ध्यास असतो म्हणून येथील तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी ते सदैव प्रयत्न करीत असतात” असे त्यांनी सांगितले.

भरपूर उद्योगांचा निर्धार – आ. नितेश राणे तडफेने बोलत होते. त्यांनी सांगितले, “त्यासाठी या दोनही जिल्ह्यात लहान मोठ्या उद्योग व्यवसायांची साखळी तयार व्हावी असा त्यांचा सतत प्रयत्न असतो. आता केंद्रीय उद्योगमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याने या भूमीत पर्यावरण पूरक व भरपूर रोजगार देणारे उद्योग आणण्याचा त्यांचा निर्धार आहे” असे त्यांनी उत्साहाने सांगितले.

२५ हजारांना रोजगार – आ. नितेश राणे हे देखील ना. नारायण राणे यांच्याप्रमाणेच तरुणांना रोजगार मिळावा यासाठी अहर्निश प्रयत्न करीत असतात. मध्यंतरी त्यांनी मुंबईतील कामगार मैदानावर तरुणांचा जंगी ‘रोजगार मेळावा’ घेतला. त्यावेळी एकाच दिवसात २५ हजार पेक्षाही अधिक म्हणजेच पाव लाखाहून अधिक तरुण, तरुणींना रोजगार देण्यात आला होता. हा जागतिक विक्रम म्हणून ओळखला गेला व त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये करण्यात आली.

मालवणात चित्रनगरी – “ना. नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय उद्योग खाते असल्याने आगामी काळात फार मोठ्या प्रमाणात येथील तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. मालवण येथे १० एकराच्या परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ‘चित्रनगरी’ उभारण्यात येणार असून तेथे चित्रपटांची शुटींग करण्यात येतील” असेही त्यांनी सांगितले.

नारायण राणेंची ‘क्रेझ’ – आ. नितेश राणेंनी सांगितले, “नारायण राणे साहेबांची संपूर्ण मतदार संघात फार मोठी ‘क्रेझ’ आहे. जनमानसात त्यांच्याबद्दल आदरभाव वसत आला असून ते कोठेही गेले की त्यांच्याभोवती प्रचंड गर्दी जमा होते.. हेच त्यांच्या यशाचे गमक आहे आणि हीच त्यांच्या दैदिप्यमान विजयाची ‘गुरुकिल्ली’ असेल!” अशा शब्दात त्यांनी ना. नारायण राणे यांच्या विजयाबद्दल दमदार आत्मविश्वास व्यक्त केला.

गुलाल आम्ही उधळणार! – आ. नितेश राणे प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होते. त्यांनी सांगितले, “राणे साहेबांच्या विजयाचा गुलाल मतमोजणीच्या दिवशी आम्हीच उधळणार! या भूमीचा विकास फक्त नारायण राणे हेच करु शकतात याची आता येथील जनतेला पुरेपुर खात्री झाली आहे. येथील भूमीपूत्र आता समृध्द विकासासाठी आतूर झाले आहेत आणि त्यांच्या अपेक्षा फक्त राणे साहेबच पूर्ण करु शकतात याचा त्यांना पूर्ण विश्वास आहे” अशा शब्दात त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

बुथ वॉरीयर्सची फौज – आ. नितेश राणे यांनी सांगितले, “मतदार संघाच्या या टोकापासून त्यां टोकापर्यंत फक्त आणि फक्त कार्यक्षम यंत्रणा भाजपकडेच आहे. कुणी कितीही गमजा मारल्या तरी काहींचे बुथही उभे राहू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. भाजपने फार पूर्वीपासून तयारी केली आणि प्रत्येक बुथ सांभाळण्यासाठी ‘बुथ वॉरीयर्स’ची फौज तयार केली.

विजयाचा आत्मविश्वास ! – आ. नितेश राणे भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “संपूर्ण मतदार संघात कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, बुथ वॉरीयर्सची भाजपची यंत्रणा, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, दिग्गज नेत्यांची मनःपूर्वक साथ, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, आजवरच्या विकास कार्याची ‘शिदोरी’ व येथील जनता जनार्दनाचा भरभरुन आशिर्वाद या बळावर नारायण राणे साहेब ‘रेकॉर्ड ब्रेक’ ३ लाखांच्या घसघशीत मताधिक्क्याने विजयी होतील!” असा दमदार विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular