24.6 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriरिफायनरी विरोधी संघर्ष समितीचा राउतना पाठींबा

रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचा राउतना पाठींबा

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सर्वसामन्यासाठी झटणाऱ्या शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग – लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने आपला पाठींबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्यावतीने तसा दावा करण्यात आला आहे.’कोकणात पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प आणण्याचा घाट राज्य सरकारने वारंवार केला. मात्र कोकणवासियांनी एकजुटीने त्याला विरोध केला. कोकणी माणूस आणि पर्यावरणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका कोकणी माणूस विसरणार नाही.

त्यामुळेच रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीने (नाणार विभाग) उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सर्वसामन्यासाठी झटणाऱ्या शिवसेनेला पाठींबा जाहीर केला आहे. कोकणात कोणत्याही परिस्थितीत महाप्रदूषणकारी पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्प होता कामा नये ही खासदार विनायक राऊत यांची भूमिका आहे. त्यामुळे राऊत यांना या निवडणुकीत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष राजाराम कुवरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular