31.3 C
Ratnagiri
Sunday, June 2, 2024

पावसामुळे धरणातील साठ्यात वाढशहरवासीयांना दिलासा

तालुक्यामध्ये गेले पंधरा दिवस सातत्याने वळवाचा पाऊस...

आता सातबारावर दिसणार आईचे नाव भूमी अभिलेख विभागाकडून निर्णय

शाळेच्या दाखल्यासह विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा...

सुट्टीसाठी गावी आलेल्या मुलीला काटा टोचल्यासारखे वाटलं अन्……

कोकणात सर्पदंशानंतर व्यक्तींना ठराविक वेळेत उपचार न...
HomeChiplunचिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

ऐन उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरीक हैराण झाले.

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि परिसरात वादळी वाऱ्याने नागरीकांची धावपळ उडवली. गुरुवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर वादळ झाले होते. त्या तुलनेत शुक्रवारी फार मोठे वादळ झाले नसले तरी अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली. वादळ वारा सुटला असतानाच पाऊस देखील आला. अनेक ठिकाणी पाऊस शिंपडला. त्यापाठोपाठ वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक भागात शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत अंधार होता. ऐन उन्हाळ्यात वीज खंडित झाल्याने नागरीक हैराण झाले. दरम्यान या वादळाने कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र गुरुवारी झालेल्या वादळात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular